आता बेस्टच्या इलेक्‍ट्रिक बस 

किरण कारंडे
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुंबई - बेस्ट उपक्रमाच्या वाहतूक विभागाच्या ताफ्यात तीन इलेक्‍ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. कुलाबा बस डेपोमध्ये या बसचा मुक्काम आहे. मेपासून या बसची सेवा सुरू होणार आहे. बॅटरी ऑपरेटेड असल्यामुळे या बसला रिंग रूटचे मार्ग देण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमाने सहा बॅटरी ऑपरेटेड बसच्या खरेदीचा निर्णय घेतला होता. या बसची किंमत दीड कोटी आहे. पालिकेने या प्रकल्पासाठी दहा कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

बॅटरी पूर्ण चार्ज असताना 130 ते 180 किलो मीटर अंतर कापण्याची या बसची क्षमता आहे. बेस्ट बस चार्ज करण्यासाठी डेपोमध्ये ठिकठिकाणी चार्जिंग पॉईंट्‌स तयार करण्यात आले आहेत. बॅटरी ऑपरेटेड बससाठीचे नियोजन सध्या सुरू असून मेमध्ये त्या रस्त्यावर धावू लागतील, अशी माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांनी दिली. या बसचे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. बससाठी आवश्‍यक परवानग्या घेणे बस निर्मात्या कंपनीने घेणे अपेक्षित आहे. या परवानग्यांची पूर्तता येत्या महिन्याअखेरीपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर बेस्ट उपक्रम स्थानिक पातळीवर आरटीओकडून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करेल, असेही त्यांनी सांगितले. या बसमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही. तसेच त्या पर्यावरणाला अनुकूल असल्याचे ते म्हणाले. 

इथे धावतात इलेक्‍ट्रिक बसेस 
जगभरातील अनेक शहरांत सध्या सात हजार 500 इलेक्‍ट्रिक बस धावतात. त्यामध्ये आता मुंबईचा समावेश होईल. इंग्लंड, नेदरलॅंड, मलेशिया, हॉंगकॉंग यासोबत दिल्ली, राजकोट आणि मनालीमध्ये इलेक्‍ट्रिक बस धावतात. बेस्टने सहा बस घेण्याचा निर्णय समितीकडून मंजूर करून घेतला आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातही आगामी कालावधीत एमएमआरडीएमार्फत हायब्रीड बस दाखल होणार आहेत. 

Web Title: electric bus in mumbai