मुरबाड तालुक्यात विज कंपनीच्या गलथान कारभाराने घेतला जीव

नंदकिशोर मलबारी
रविवार, 29 एप्रिल 2018

मुरबाड तालुक्यातील विज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत असुन काहीना आपला प्राणही गमवावा लागला असल्याने महावितरण विरोधी नागरीक नाराजीचा सुर काढत असल्याचे समोर येत असुन विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराचे करायचे काय? असा प्रश्न मुरबाड तालुक्यातील जनतेला पडला आहे. 

सरळगांव - मुरबाड तालुक्यातील धसई गावात झाडाच्या फांद्या तोडताना उच्च दाबाची तारेचा शॉक लागुन एकाचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मुरबाड तालुक्यातील विज कंपनीच्या गलथान कारभाराचा फटका नागरिकांना बसत असुन काहीना आपला प्राणही गमवावा लागला असल्याने महावितरण विरोधी नागरीक नाराजीचा सुर काढत असल्याचे समोर येत असुन विद्युत वितरण कंपनीच्या कारभाराचे करायचे काय? असा प्रश्न मुरबाड तालुक्यातील जनतेला पडला आहे. आज धसई गावात उंबराच्या झाडाच्या  फांद्या  तोडत असताना  या झाडावर लटकलेल्या उच्च दाबाच्या तारेचा शॉक लागुन लक्ष्मण गोल्हे यांचा दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली यामुळे परिसरात महावितरण बाबत असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील जुने पोल, लोंबकळणाऱ्या तारा, जिर्ण रोहीत्र बदलण्यासाठी 99 लाख रुपये खर्च करण्यात आले. मात्र सर्व सामान्यापेक्षा फार्म हाउस वाल्यानाच याचा जास्त फायदा  झाला असल्याच्या तक्रारी समोर येत आहे.

पाच महिन्यांपूर्वी सासणे येथे उच्च दाबाची विद्युत वाहीणी रस्त्यावर पडली होती. या रस्त्यावरून प्रवास करीत असलेल्या एका इंजिनिअर तरुणाला शॉक लागल्याने  आपला प्राण गमवावा लागला. आज धसई येथे लक्ष्मण गणपत गोल्हे हे टेलरकाम करीत असलेले गृहस्थ घराशेजारील उंबराच्या झाडांवरून गेलेल्या विद्युत वाहीणीने झाडाला करंट येत असल्याने झाडाच्या फांद्या तोडताना शाॅक लागून लक्ष्मण गोल्हे याचा जागीच मृत्यु झाला. अशा अनेक घटना तालुक्यात घडत असताना विद्युत वितरण कंपनीचा कारभार काही केल्या सुधारत नाही. त्यातच धसई शाखा अभियंताचे कार्यालय म्हणजे रामभरोसे यंत्रणा झाली असल्याचे सांगण्यात नागरिक सांगतात. चार महीन्यापुर्वी धसई कार्यालयावर शेकडो नागरिकांनी जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून या अधिका-यांना जागे करण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्यांच्या कारभारात सुधारणा न झाल्याने गोल्हे यांना आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेस धसईचे शाखा अभियंता बोकेफोडे व मुरबाडचे उपकार्यकारी अभियंता दिलीप डवंगे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणीही नातलगानी केली आहे. 
       
याबाबत जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत यांना विचारले असता चार महीन्यापुर्वी शेकडो नागरिकांनी मोर्चा काढला होता तरी देखील विद्युत वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा झाली नाही. या घटनेस शाखा अभियंता बोकेफोडे जबाबदार असून यांनी शासनाला बदनाम करण्याचा विडा उचलला असल्याचे दिसून येत आहे. अशा अधिकाऱ्यावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी शासनाकडे करणार असल्याचे सांगितले. तर महावितरण धसई शाखेचे अभियंता बोकेफोडे यांनी धसई येथील लक्ष्मण गणपत गोल्हे हे उंबराच्या झाडाची फांदी तोडत होते. त्यांनी ती तोडताना आमच्या कार्यालयाची परवानगी घेतली नसल्याने या घटनेशी आमचा सबंध येत नाही असे सांगत आरोपांचे खंडन केले आहे.     

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.               

Web Title: Electricity company does not work properly in Murbad taluka