विजेच्या मागणीत दुपारच्या वेळेत वाढ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 एप्रिल 2017

मुंबई - उकाड्यामुळे राज्यात विजेच्या मागणीत वाढ होत आहे. दुपारी तीन ते चार या वेळेत विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. एसी, कुलर, पंखा यांसारख्या उपकरणांचा वापर वाढल्याने वीज वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे.

या वर्षी 30 मार्चला राज्यात सर्वाधिक विजेची मागणी (19,700 मेगावॉट) झाल्याची नोंद "महावितरण'कडे आहे. "महावितरण'च्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी झाली. त्या दिवशी "महावितरण'ला 538 मेगावॉटचे भारनियमनही करावे लागले. यंदा राज्यातील अनेक भागांत कृषी पंपासाठीही विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. मागील काही दिवसांत विजेची मागणी 18 ते 19 हजार मेगावॉट दरम्यान होती, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: electricity demand increase in afternoon time