प्रजासत्ताकदिनी कल्याणमधील रिंगरुटबाधितांचा एल्गार 

रवींद्र खरात
सोमवार, 27 जानेवारी 2020

शिळफाटा-डोंबिवली-कल्याण व्हाया टिटवाला या दरम्यान रिंगरुट रस्त्याचे काम एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या माध्यमातून होणार आहे. यात रस्त्यातील अटाळी आणि आंबिवली परिसरामधील बाधित नागरिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेतृत्वाखाली रविवारी (ता. 26) प्रजासत्ताक दिनी सकाळी 7 च्या सुमारास पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनीच मोर्चा काढल्याने सुरक्षा यंत्रणांचे चांगलेच धाबे दणाणले होते. 

कल्याण : शिळफाटा-डोंबिवली-कल्याण व्हाया टिटवाला या दरम्यान रिंगरुट रस्त्याचे काम एमएमआरडीए आणि कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या माध्यमातून होणार आहे. यात रस्त्यातील अटाळी आणि आंबिवली परिसरामधील बाधित नागरिकांनी रिपब्लिकन पक्षाच्या (आठवले गट) नेतृत्वाखाली रविवारी (ता. 26) प्रजासत्ताक दिनी सकाळी 7 च्या सुमारास पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढून आपला निषेध व्यक्त केला. प्रजासत्ताक दिनीच मोर्चा काढल्याने सुरक्षा यंत्रणांचे चांगलेच धाबे दणाणले होते. 

अॅमेझॉनसाठी मध्य रेल्वेकडून मालडबा

आंबिवली, अटाळी परिसरामधील एकूण 945 कुटुंबीय या रिंगरूट प्रकल्पामध्ये बाधित होणार आहेत. रिंगरुट प्रकल्पात अडथळा ठरणारी घरे, दुकाने, इमारती हटवण्यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेमार्फत नागरिकांना नोटिसा देण्यास सुरुवात झाली आहे.

त्यामुळे आंबिवली आणि अटाळी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून कुठलेही पुनर्वसनाचे धोरण जाहीर न करता नोटीस आणि अन्य कारवाई सुरू केल्याच्या निषेर्धात रविवारी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय महासचिव दयाल बहादूरे, जालींदर बर्वे, संदीप घाडगे, सुवर्णा पाटील आदींसमवेत बाधित नागरिकांनी पालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढला. 

कर्नाटकच्या तिरंग्याचा मुंबईत बोलबाला

प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम असल्याने पालिका मुख्यालय प्रवेशद्वारावर मोर्चा अडवण्यात आला. त्याचवेळी मोर्चेकरी घोषणाबाजी करू लागले. अखेर नागरिकांना आत सोडण्यात आले. मात्र त्यांच्या मागणीचा फलक सुरक्षा रक्षकांनी काढून घेतला. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर नागरिकांनी पालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन निवेदन देत समस्य मांडल्या. आयुक्तांनी लवकरात लवकर विषय मार्गी लावू, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elgar of ringroot badhits in Kalyan on Republic Day.