कोरोनामुळे नोकरी गेली आणि एलिजिबल बॅचलर्स अडचणीत; लग्नांची नोंदणीही साठ टक्क्यांनी घटली

भाग्यश्री भुवड
Tuesday, 1 December 2020

शेतकरी तरुणांची लग्ने रखडण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत असताना, आता कोरोनामुळे शहरातील तरुणाच्या नोकर्‍या गेल्यामुळे मुंबई आणि  उपनगरातील तरुणांची लग्ने रखडण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

मुंबई, 1 : शेतकरी तरुणांची लग्ने रखडण्याची मोठी सामाजिक समस्या गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावत असताना, आता कोरोनामुळे शहरातील तरुणाच्या नोकर्‍या गेल्यामुळे मुंबई आणि उपनगरातील तरुणांची लग्ने रखडण्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरवर्षी मुंबई उपनगरात तीन हजारांहून अधिक लग्नांंची रजिस्टर कार्यालयात नोंदणी होेते. मात्र, यंदा 60 टक्के लग्नाची नोंदणी कमी झाल्याची आकडेवारी सामोर आली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रोजगार गेले, त्यामुळे यावर्षी अनेकांना आपल्या लग्नाचा विचार पुढे ढकलावा लागला. कारण नोकरी नाही तर लग्न करणार कसे? असा प्रश्न तरुणांना पडत आहे. 

महत्त्वाची बातमी : उर्मिला मातोंडकर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

प्रत्येक तरुण तरुणीच्या आयुष्यातील लग्न हा महत्वाचा भाग आहे. मात्र यावेळी अनेकांच्या लग्नांवर कोरोनामुळे विरजण पडले आहे. लॉकडाऊनमुळे मुंबईत अनेक उद्योगांना फटका बसला असून हॉटेल, रिटेल आणि त्यांच्याशी संबंधित उद्योग बंद पडल्याने लाखो कर्मचार्‍यांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे. त्यामुळे यंदा लग्न करण्याचा विचार असलेल्या  तरुणांना तो बेत रद्द करावा लागला. इतकेच नव्हे तर काही जणांना ठरलेले लग्न केवळ नोकरी गेल्यामुळे मोडावे लागले आहे.  

कोरोना काळात कमी खर्चात रजिस्टर लग्नाचा पर्यायही बहुतेक मुंबईतील तरुण स्वीकारतील, असे वाटत होते. पण, मुंबई शहर व उपनगरातील रजिस्टर लग्नांची संख्या यंदा सुरुवातीपासून कमी झालेली दिसत आहे. मुंबई शहरात गेल्या वर्षी  1 हजार 299 रजिस्टर पध्दतीने लग्न झाली होती. मात्र कोरोना काळात नोंव्हेबरपर्यंत 448 लग्न रजिस्टर पध्दतीने झाली आहेत. हीच परिस्थिती उपनगरातील मॅरेज रजिस्टर कार्यालयात दिसून येत आहे. गेल्या वर्षी 3 हजार 495 लग्न रजिस्टर पध्दतीने झाली होती. यंदा 1 हजार 806 लग्न रजिस्टर पध्दतीने झाली आहेत.

महत्त्वाची बातमी : उर्मिला मातोंडकर रिटर्न्स ! शिवसेनेत अधिकृत प्रवेश करत उर्मिला होणार राजकारणात पुन्हा सक्रिय
 

नोेंदणी झालेले विवाह - 

  • वर्ष           2018         2019        2020 
  • मुंबई         1341         1299       448
  • उपनगर     3707         3495        1806   

विवाह अधिकारी मीना आंबिलपुरे म्हणालेत,  कोरोना संसर्गाच्या भीतीपोटी अनेक इच्छुकांनी लग्नाची तारीख पुढे ढकलली आहे. आजही दिवसाला सरासरी दोन ते तीनच विवाह रजिस्टर होतात. आता लग्नसराईचा काळ येत असल्याने विवाह रजिस्टर करण्याची संख्या वाढेल अशी आशा आहे. 

50 टक्के लग्न रद्द-

कोरोना काळात अनेक तरुणांच्या नोकर्‍या गेल्यामुळे राज्यातील 50 टक्के तरुणांनी आपले लग्न यंदा रद्द केले आहे. तर काही जणांचे लग्न अगोदरच जुळले होते. मात्र  ऐन लग्नाच्या तोंडावर नोकरी गेल्याने त्यांच्यापुढे अडचण उभी राहिली. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या. त्यामुळे नक्कीच त्याचा परिणाम झाला आहे असं धर्मेद्र चव्हाण ( सचिव, पुरुष हक्क संरक्षण समिती, महाराष्ट्र) म्हणालेत.

eligible bachelors are in trouble as many people lost their jobs amid corona


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: eligible bachelors are in trouble as many people lost their jobs amid corona