
Elphinstone Bridge Construction
ESakal
मुंबई : एल्फिन्स्टन पुलाअभावी या मार्गे जाणाऱ्या बेस्ट बसगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. परिणामी, शिवडी ते परळ परिसरातील विद्यार्थी आणि नोकरदारवर्गाची मोठी गैरसोय सुरू झाली आहे. अनेक वर्षांपासून चालत आलेले काही महत्त्वाचे बसमार्ग परळपर्यंतच मर्यादित झाल्याने शिवडीहून दादर, परळ, सांताक्रूझसारख्या ठिकाणी पोहोचणे कठीण बनले आहे.