

Elphinstone Bridge construction
ESakal
बापू सुळे
मुंबई : वरळी-शिवडी कनेक्टरसाठी ‘एमएमआरडीए’कडून एल्फिन्स्टन येथे उभारण्यात येणाऱ्या डबल डेकर पुलामुळे येथील दोन इमारतींमधील ८३ घरे बाधित होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एमएमआरडीए म्हाडाच्या माध्यमातून संबंधित रहिवाशांना दादर, प्रभादेवी, वडाळा, अँटाॅप हिल परिसरात घरे देणार आहे. त्यामुळे रहिवाशांना हक्काची घरे मिळणार असून, म्हाडालाही यातून उत्पन्न मिळणार आहे. रेडिरेकनर दराच्या तब्बल ११० टक्के दराने या घरांची किंमत आकारली जाणार असल्याने म्हाडाला तब्बल ९६ कोटी ८२ लाख रुपये एकरकमी मिळणार असल्याचे समोर आले आहे.