Elphinstone Bridge
मुंबई : मुंबईत परळ आणि प्रभादेवीला जोडणारा महत्त्वाचा एल्फिन्स्टन पूल बंद होऊन पाच दिवस झाले आहेत. पुलाचे पाडकाम सुरू झाल्यामुळे या भागातील नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जाव लागत आहे, मात्र याचा सर्वाधिक फटका रुग्णवाहिकांना बसतोय. कोंडीमुळे रुग्णवाहिकेला रुग्णालय गाठण्यासाठीचा सरासरी वेळ वाढला आहे.