कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी मुंबई पालिका सज्ज

मिलिंद तांबे
Thursday, 19 November 2020

फेरीवाले, दुकानदार, कामगार, वाहतूकदार तसेच बेस्ट आणि एसटी वाहक-चालकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. दिवाळी दरम्यान या बाजारांमध्ये लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. हे लक्षात घेऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शक्यतेमुळे पालिकेच्या आरोग्य विभाग गर्दी होणाऱ्या बाजारांमध्ये कोरोना चाचण्या करणार आहे. फेरीवाले, दुकानदार, कामगार, वाहतूकदार तसेच बेस्ट आणि एसटी वाहक-चालकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. दिवाळी दरम्यान या बाजारांमध्ये लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. हे लक्षात घेऊन खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी रुग्णालयातील सर्व रुग्णांची डिश्चार्ज पूर्वी चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ओपीडी तसेच डिस्पेनसरीमधील आरोग्य कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांची देखील तपासणी करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवल्याने ही खबरदारी घेण्यात येत आहे. याशिवाय सर्वांना मुखपट्टी तसेच सामाजिक अंतर राखण्याबाबत शासनाच्या निर्देशांचा पालन करण्यास देखील सांगण्यात येत आहे.

रुग्णालयांतील चाचण्यांना सुरुवात करण्यात आली आहे. बाधित रुग्णांचे प्रमाण फारच कमी असल्याचे ही काकाणी यांनी पुढे सांगितले. भायखळ्यातील रुचर्डसन ऍण्ड कृडास कंपनीतील कोविड केंद्रातील 68 तर मुलुंड येथील जम्बो फॅसिलिटी केंद्रातील 90 कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यात आली. मात्र त्यात एक ही बाधित रुग्ण आढळला नाही. बीकेसी जम्बो फॅसिलिटी केंद्रात 335 जणांची चाचणी करण्यात आली असून त्यातील 5 जण बाधित आढळले.  नायर रुग्णालयंतील 115 पैकी केवळ 1 कर्मचारी बाधित आढळला.

अधिक वाचा-  मोठी बातमी : कोरोना लसीसाठी डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला सुरुवात

दिवाळीनिमित्त बाजारात मोठी गर्दी झाल्याने पुढील आठवड्यात कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे महत्त्वाचे बाजार तसेच गर्दीची ठिकाणं निर्धारित करणे सुरू केले असल्याचे एल वार्डचे विभाग अधिकारी जितेंद्र जाधव यांनी सांगितले.  दुकानदार, फेरीवाले यांच्या चाचण्या सुरू केल्याचे के पश्चिम विभाग अधिकारी गुलनार खान यांनी सांगितले.

अधिक वाचा- शाळांचे निर्जंतुकीकरण सुरू, 23 नोव्हेंबरपासून नववी, दहावी, बारावीचे वर्ग होणार सुरु

कोरोनाची दुसरी लाट आली तर रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता आहे. सध्या अनेक जम्बो कोविड सेंटर तसेच खासगी रुग्णालयातील खाटा रिकाम्या आहेत. असे असले तरी सध्या तरी डिसेंबर पर्यंत या सर्व खाटा परत न करता पालिकेच्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे ही काकाणी यांनी सांगितले. कोरोना महामारी पसरल्यापासून मुंबईतील बाधित रुग्णांचे प्रमाण हे 15.93 इतके आहे. मात्र नेहमी होणाऱ्या चाचण्यांमध्ये हा दर आणखी कमी म्हणजे केवळ 10 ते 14 टक्के असल्याचे ही काकाणी यांनी सांगितले.

-----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Emphasis on hawker shopkeeper driver tests BMC is ready face the second wave


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Emphasis on hawker shopkeeper driver tests BMC is ready face the second wave