मोठी बातमी : कोरोना लसीसाठी डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला सुरुवात 

मिलिंद तांबे
Thursday, 19 November 2020

कोरोना लसीसाठी अखेर इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल, आयुष आणि सरकारी डॉक्टर यांची नोंदणी सुरु झाली आहे.

मुंबई : कोरोना लसीसाठी अखेर इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल, आयुष आणि सरकारी डॉक्टर यांची नोंदणी सुरु झाली आहे. ही नोंदणी राज्यशासनच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. सध्या ही नोंदणी जिल्हास्तरीय पातळीवर सुरू असून राज्य आरोग्य विभाग यावर नियंत्रण करत असल्याची माहिती राज्य लसीकरण अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली.

सुरुवातीला राज्य शासनाच्या डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांना या नोंदणीत सहभागी करून घेण्यात आले. मात्र खासगी डॉक्टरांना यात सहभागी करून न घेतल्याने खासगी डॉक्टरांनी संतप्त भूमिका जाहीर केली. यात राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे महाराष्ट्राच्या सर्व खासगी डॉक्टरांना प्रस्तावित कोरोना लसीकरणातून वगळले होते. मात्र हा निर्णय केंद्र सरकारच्या प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वाविरूद्ध होता त्यामुळे राज्यातील तब्बल 2,50,000 डॉक्टरांना वगळण्याच्या निर्णयामुळे डॉक्टरांमध्ये हा असंतोष पसरला होता. 

महत्त्वाची बातमी : "मुंबई महापालिकेवर भगवा फडकेल पण तो भाजपचाच, बाळासाहेबांच्या संघर्षासाठी उभे राहू." - फडणवीस

चर्चा करून अखेर राज्य शासनाच्या आरोग्यविभागाने महाराष्ट्र राज्यातील सर्व डॉक्टरांना प्रस्तावित कोरोना लसीकरण डेटाबेसमध्ये समाविष्ट केले आहे असे आयएमएला कळवले, तशी माहिती आयएमए महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली. यात महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल, आयएमए सदस्य  आणि आयुष असे मिळून 2,50,000 खासगी डॉक्टरांचा समावेश करण्यात आला  आहे.  त्यांच्यासोबत काम करणारे 10 लाख  वैद्यकीय कर्मचारी यांचाही सहभाग झाला. आयएमए आणि आयुष मिळून सुमारे 40  टक्के नोंदणी झाली असल्याची माहिती डॉ. भोंडवे यांनी दिली.

महत्त्वाची बातमी : पत्रिपुलासाठी मेगाब्लॉक! मध्य रेल्वेचे वेळापत्रक जाहीर; पर्यायी एसटी, केडीएमटी, टीएमटी विशेष बसेस सोडणार

लस येण्यासाठी काही महिने बाकी असतानाच आम्ही नोंदणी सुरू केली आहे. यात एका ऍपच्या मदतीने माहिती भरण्यात येत आहे. मात्र नाव पत्ता आणि ओळखपत्र यासारखी माहिती यात भरायची आहे. यासाठी आयएमए आणि आयुषची मदत झाली आहे. खासगी डॉक्टरांची  माहिती या संस्थानी दिली असली तरी हे काम सध्या जिल्हापातळीवर सुरू आहे. राज्य शासनाचा  आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवत आहे. मात्र जिल्हा स्तरावर नोंदणी झाल्यावर राज्य आरोग्य विभागात ही माहिती येणार आहे. त्यानंतर डॉक्टर आणि वैद्यकिय कर्मचार्यांची माहिती उपलब्ध होणार आहे. असे  राज्य लसीकरण अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.

registration for covid 19 vaccine begins in mumbai with specific application


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: registration for covid 19 vaccine begins in mumbai with specific application