बॅंकांच्या विलीनीकरणाविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक 

बॅंकांच्या विलीनीकरणाविरोधात कर्मचारी संघटना आक्रमक 


मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे विलीनीकरणाविरोधात बॅंकांमधील कामगार संघटना येत्या 10 डिसेंबरला संसदेबाहेर ठिय्या आंदोलन करणार आहेत. सरकारच्या 10 सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी बॅंक युनियन संसदेवरच धडकणार आहेत. ऑगस्टमध्ये केंद्राने 10 सार्वजनिक बॅंकांचे एकत्रीकरण करून बॅंकांची संख्या चारपर्यंत कमी केली जाणार आहे; मात्र यातून होणाऱ्या प्रतिकूल परिणामांकडे दुर्लक्ष करून सरकार विलीनीकरणाचे धोरण राबवत आहे, असा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. देशात आणि परदेशातील बॅंकांच्या विलीनीकरणामुळे कोणाचाही लाभ होत नसल्याचे आतापर्यंत दिसून आल्याचे मत संघटनांनी व्यक्त केले आहे. सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी येत्या 10 डिसेंबरला बॅंकांच्या संघटना संसदेसमोरच धरणे आंदोलन करतील, अशी माहिती संघटनांनी दिली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com