कामगारांचा भविष्यनिर्वाह निधी संचालकांनी हडपला 

दिलीप पाटील
बुधवार, 17 एप्रिल 2019

वाडा : वाडा तालुक्यातील कोंढले ग्रामपंचायत हद्दीतील कपॅसिटी स्ट्रक्चर्स (प्रतिभा) या कंपनीतील सुमारे 279 कामगारांचे भविष्य निर्वाहनिधी सरकारी कार्यालयात न भरता संचालकांनी तो हडपला असून 70 लाख 23 हजार रूपयांचा अपहार केल्या प्रकरणी कंपनीच्या दोन संचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाई मुळे भविष्य निर्वाह निधी न भरणाऱ्या उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.  

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडा तालुक्यातील कोंढले या ग्रामपंचायतीच्या हद्दीत कपॅसिटी स्ट्रक्चर्स (प्रतिभा) ही कंपनी आहे.या कंपनीत 279 कामगार काम करीत आहेत. या कामगारांकडून कंपनीने एप्रिल 2017 ते सप्टेंबर 2018 या कालावधीत 70 लाख 23 हजार 108 रूपयांची भविष्य निर्वाह निधीची कपात कामगारांच्या वेतनातून केली आहे. मात्र कर्मचारी भविष्य निधी संघटन या कार्यालयात भरला नाही.  कामगारांनी चौकशी केली असता सदर रकमेचा भरणा न करता अपहार केल्याचे कामगारांच्या लक्षात आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे दिसून आले. 

या प्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रशांत सुबनावळ करीत आहेत. आरोपी पळून जातील म्हणून त्यांची नावे पोलिसांनी सांगण्यास नकार दिला आहे. 

Web Title: employees PF captured by directors