
मुंबई- कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव मुंबईत सर्वाधिक आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. अशातच विनाशुल्क, सार्वजनिक शौचालयांची सेवा देणारे कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून पगाराविना आहेत. तसंच अशा कठिण परिस्थितीत कर्मचारी स्वच्छता आणि देखभाल सुनिश्चित करण्यासाठी संघर्ष करताहेत.
लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून उत्पन्न ठप्प आहे. शहरातील एक हजाराहून अधिक सार्वजनिक शौचालये आपल्या कर्मचार्यांना पगाराची भरपाई करण्यासाठी आणि चोवीस तास शौचालयाची देखभाल करण्यासाठी धडपडत असल्याचं चित्र सध्या आहे.
कोविड -19 चा उद्रेक पाहता बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) यांनी 16 एप्रिल रोजी शहरातील सर्व पे-अँड-यूज शौचालयांना मोफत सेवा देण्याचे आदेश दिले होते. गरिब आणि स्थलांतरित मजुरांना सुविधा अधिकाधिक सुलभ करण्याच्या उद्देशानं या निर्णयाचा विचार करण्यात आला. दरम्यान, कोणतंही उत्पन्न नसतानाही, ही स्वच्छतागृहे चालविणार्या स्वयंसेवी संस्थांनी कर्मचार्यांना पगार देण्याचा दावा केला आहे. तसंच सुविधांमध्ये स्वच्छता राखण्यासोबतच वीजबिल भरणं ही देखील मोठी समस्या उद्भवली.
मुंबईत अशी सुमारे 1,100 शौचालये आहेत. सार्वजनिक शौचालयांमध्ये शौचालय वापरण्यासाठी सामान्यत: 2 ते 5 रुपये आणि आंघोळीसाठी 10 रुपये शुल्क आकारले जातात. प्रशासन जमीन उपलब्ध करुन देते, अशा सुविधांचे बांधकाम आणि कामकाज स्वयंसेवी संस्था (NGOs)वेतन आणि वापराच्या आधारावर करतात.
मुंबईच्या सार्वजनिक स्वच्छताविषयक सुविधा (पीएससी) असोसिएशनचे अध्यक्ष धीरज गोहिल म्हणाले की, कर्मचार्यांचा पगार आणि देखभाल खर्च सामान्यत: जनतेच्या पैशाच्या शौचालयाच्या शुल्कापोटी घेण्यात येतो. गेल्या दोन महिन्यांपासून उत्पन्न शून्य झाले आहे. मात्र या स्वच्छतागृहांवरचा खर्च जास्त करुन स्वच्छता पातळी सुनिश्चित करण्यासाठी येत असून हा खर्च आता वाढला आहे. पूर्वी शौचालय दिवसातून तीन वेळा स्वच्छ केले जात असे, परंतु आता आम्ही दररोज कमीत कमी पाच वेळा त्या स्वच्छ करतो. तसेच आम्ही स्वच्छता कर्मचार्यांना हँड सॅनिटायझर्स, मास्क आणि गोल्ह्व्ज पुरवितो, ज्यामुळे आपला आर्थिक भार वाढला असल्याचं गोहिल म्हणालेत.
गोहिल, वांद्रे आणि बोरिवली येथे अनेक सार्वजनिक पे-अँड यूज टॉयलेट्स चालवित आहेत. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक सार्वजनिक शौचालयात सुमारे सात हजार रुपये मासिक पगारासाठी किमान तीन कर्मचारी काम करतात. एका ऑपरेटरनं असं म्हटलं आहे की, एका सार्वजनिक शौचालयामधून साधारणत: दरमहा सुमारे 60,000 ते 70,000 रुपयांची कमाई होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.