
धारवीसह दादर-माहीम परिसरात आज केवळ 62 रुग्णांची भर पडली. धारावीत आज केवळ 12 नवीन रुग्णांची नोंद झाली.
कोरोनाबाॅम्ब ठरलेल्या धारावीतून गुड न्यूज
मुंबई : धारवीसह दादर-माहीम परिसरात आज केवळ 62 रुग्णांची भर पडली. धारावीत आज केवळ 12 नवीन रुग्णांची नोंद झाली. धारावीतील रुग्णसंख्या 2170 वर पोहोचली आहे. महत्वाचे म्हणजे आज ही एकाही रूग्णाचा मृत्यू झाला नाही.
धारावीत आज 12 नवीन रुग्ण सापडल्याने रुग्णांची संख्या 2170 वर पोहोचली आहे. आज एकही रुग्ण दगावला नसून मृतांचा आकडा 80 इतका झाला आहे. तर माहीम मध्ये आज 21 नवीन रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या 923 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 14 इतका आहे. तर दादर मध्ये आज 29 नवीन रुग्ण सापडले असून रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाली असून रुग्णांची एकूण संख्या ही 662 इतकी झाली आहे. तर आजपर्यंत 16 मृत्यू झाले आहेत.
... नाहीतर कोरा मातीचा गणपती पुजावा लागेल
धारावीसह दादर आणि माहीम मधील परिस्थिती देखील नियंत्रणात असल्याचे दिसते. या तीनही परिसरात मिळून आज दिवसभरात 62 नवीन रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांची संख्या 3755 इतकी झाली आहे. तर मृतांचा आकडा 110 इतका आहे. धारावी, दादर, माहीम परिसरात बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत देखील दिलासादायक वाढ झाली आहे. आज जी उत्तर विभागात 12 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत दादर 270 , माहीम 366 तर धारावीत 1057 असे एकूण 1693 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
75 बालकामगार मुंबईत अडकले; तीन महिन्यानंतरही प्रशासन सुस्त
Web Title: Only 12 New Patients Found Dharavi Mumbai Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..