पालघरमध्ये मोकळ्या रस्त्यांवर फेरीवाल्याचे अतिक्रमण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

पालघर ः पालघर नगरपालिकेने गेले दोन दिवस माहीम व मनोर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकी जप्त करून पोलिस ठाण्यात जमा केल्या. त्यांच्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली असतानाच आज मोकळ्या झालेल्या जागेवर परप्रांतीय फळ-भाजी विक्रेत्यांनी हातगाड्या लावून पुन्हा कब्जा केला आहे. त्यामुळे हे विक्रेते कारवाईला जुमानत नसल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.

पालघर शहरात रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या शेकडो दुचाकी, फेरीवाले, हातगाड्या यामुळे शहरात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांनी केलेल्या तक्रारींनंतर पालिकेने शुक्रवारी (ता.२०) रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या दुचाकींवर कारवाई केली. त्या जप्त करून पालघर पोलिस ठाण्यात जमा केल्या. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली; मात्र मोकळ्या झालेल्या मनोर व माहीम रस्त्याच्या दुतर्फा रविवारी परप्रांतीय फेरीवाले, फळविक्रेते, भाजीविक्रेते यांनी हातगाड्या उभ्या करून जागा व्यापली.

मनोर रस्त्यावर बसणाऱ्या आदिवासी भाजीविक्रेत्यांनाही पालिकेने कारवाईदरम्यान हटवले. त्या जागेवरही आज परप्रांतीयांनी कब्जा करून भाजीविक्रीची दुकाने थाटल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

आज रविवारची सुट्टी असल्याने बेकायदा उभ्या करण्यात आलेल्या हातगाड्यांवर कारवाई करता आली नाही; मात्र सोमवारपासून पुन्हा कारवाई सुरू करावी लागेल.
भावानंद संखे, नगरसेवक व भाजप गटनेते

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Encroachment on open roads in Palghar