esakal | कल्याणमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरूवात; व्यापारी, दुकानदारांकडून विरोध
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरूवात; व्यापारी, दुकानदारांकडून विरोध

 कल्याण-डोंबिवली शहरातील पदपथावरील अतिक्रमण हटवण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे

कल्याणमध्ये अतिक्रमण हटवण्यास सुरूवात; व्यापारी, दुकानदारांकडून विरोध

sakal_logo
By
रविंद्र खरात

कल्याण - कल्याण-डोंबिवली शहरातील पदपथावरील अतिक्रमण हटवण्यास महापालिकेने सुरूवात केली आहे. या कारवाईला अनेक ठिकाणी नगरसेवक, आमदार तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. पुढील 15 दिवस कारवाई सुरूच राहणार असल्याचे संकेत पालिका प्रशासनाने दिले. 

खासगी शिकवणींना सशर्त परवानगी द्यावी! शिक्षकांवर भाजीपाला विकण्याची वेळ

कल्याण-डोंबिवली शहरातील पदपथावरील अतिक्रमण हटवण्याबाबत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पूर्वसूचना दिली होती. अन्यथा एक नोव्हेंबरपासून कारवाई करण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार आजपासून कारवाईला सुरुवात झाली. जे प्रभाग क्षेत्र परिसरातील पदपथावरील अतिक्रमण भारत पाटील यांच्या पथकाकडून हटवण्यात आले.

दरम्यान, ड प्रभाग क्षेत्र कार्यालयांतर्गत पदपथावर अतिक्रमण नसून ते परवानाधारक स्टॉल आहेत. त्यांनी पूर्वीच ते काढल्याने त्यांच्यावर कारवाई केली नसल्याची माहिती प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांनी दिली. कल्याण पश्‍चिमेकडील स्टेशन परिसरातील पदपथही भागाजी भांगरे यांच्या पथकाने मोकळे केले; मात्र काही वेळाने फेरीवाल्यांनी पुन्हा बस्तान माडंले. महंमद अली चौकातील कारवाईमध्ये पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप स्थानिक नगरसेवक सचिन खेमा यांनी केला. कारवाई करू नका, अतिक्रमण काढण्यास दुकानदारांना वेळ द्या, अशी मागणी त्यांनी केली. 

बेशिस्त कार्यकर्त्यांची जितेंद्र आव्हाड यांनी काढली खरडपट्टी; गटबाजीबाबत भरला सज्जड दम

दरम्यान, आग्रा मार्गावर दुकानदार आणि पालिका अधिकारी आमने-सामने आले होते. सणासुदीच्या दिवसात कारवाई करू नका. अर्धा तास वेळ द्या. थेट कारवाई करणे चुकीचे असून पालिकेने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी दुकानदारांनी केली. ब प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांच्या पथकाने सुभाष चौक ते छाया टॉकीज, बिर्ला कॉलेज रस्ता, खडकपाडा ते भवानी चौक, गोल्डन पार्क ते खडकपाडा परिसरातील पदपथ मोकळे केले. 

सणासुदीच्या काळात अनेक नागरिक खरेदीसाठी बाजारात येतात. नागरिकांना पदपथावरून चालणे सोईचे व्हावे आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे शक्‍य व्हावे, यासाठी ही कारवाई आगामी काळातही सुरू राहील. 
- डॉ. विजय सूर्यवंशी,
आयुक्त, केडीएमसी.

-----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे ) 

loading image
go to top