
Officials surveying paanand roads before initiating encroachment removal drive; farmers warned of losing government benefits.
Sakal
मुंबई: ग्रामीण भागातील शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे पाणंद रस्ते मोकळे करण्याच्या मोहिमेत अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांवर राज्य सरकार आता कठोर कारवाई करण्याच्या विचारात आहे. ज्या शेतकऱ्यांनी या शेतरस्त्यांवर अतिक्रमण केले आहे आणि ते काढण्यास स्पष्ट नकार दिला आहे, त्यांना भविष्यात कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही, अशी कठोर अट घालण्याचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे.