Mumbai News : जुनी पेन्शन लागू करा: अन्यथा देशभरात ट्रेन बंद करू; कर्मचारी संघटनेचा इशारा

केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करुन नवी पेशन्स योजना लागू केली
Enforce Old Pension Stop Trains Nationwide Warning of employee union mumbai
Enforce Old Pension Stop Trains Nationwide Warning of employee union mumbaisakal

मुंबई : केंद्र सरकारने रेल्वे कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करुन नवी पेशन्स योजना लागू केली आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी मुंबईत मराठी पत्रकार संघात वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियने पत्रकार परिषद घेतली आहे.

तसेच केंद्र सरकारने जुनी पेंशन तात्काळ लागू करावी अन्यथा वेळ पडल्यास रेल्वे बंद करण्याचा इशाराही वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियने दिला आहेत.ऑल इंडिया रेलवे मेंस फेडरेशनचे महामंत्री शिवगोपल मिश्रा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले की, १ जानेवारी २००४ पासून केंद्रासहित देशातील काही राज्यात आणि नंतर काही काळाने सर्वच राज्यात नवीन राष्ट्रीय पेंशन स्कीम लागू करण्यात आली.

या पेंशनचा सर्वात जास्त फटका सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना झालेला आहे. तेव्हा केंद्र सरकारने कर्मचारी वर्गाला एक रक्कमी काही लाख रूपये जमा होतील असे दिलेले आश्वासन फोल ठरल्याचे लक्षात येत आहे.

त्यामुळे पुन्हा जुनी पेंशन केंद्र सरकारने तात्काळ लागू करावी या मागणीला जोर धरू लागला. त्यामुळे केंद्र सरकारने जुनी पेंशन तात्काळ लागू करावी अन्यथा देशभरात आंदोलनाची हाक देण्यात येईल असा इशारा शिवगोपल मिश्रायांनी केंद्र सरकरला दिला आहे.

लोकप्रतिनिधी प्रमाणे जुनी पेन्शन द्या

२००४ नंतर भरती झालेल्या कर्मचाऱ्यांवर ही योजना थोपवून त्यांची वृद्धापकाळातील काठी सरकारने काढून घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचे सेवानिवृत्त जीवन अंधकारमय होणार आहे. नवीन पेन्शन योजनेत ग्रॅच्युइटी आणि फॅमिली पेन्शन दिली जाणार आहे. रेल्वेचे कर्मचारी दिवस रात्र काम करतात. प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही मौसमात ते काम करतात.

सैनिकासारखे काम करून प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवतात. ट्रॅकवर काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. मग सेनेमध्ये काम करणाऱ्या सैनिकांप्रमाणे तसेच खासदार आणि आमदार यांच्याप्रमाणे रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना का लागू नाही, असा प्रश्न वेस्टर्न रेल्वे एम्प्लॉइज युनियनकडून विचारण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com