

ED Action
sakal
बदलापूर : बदलापूर गाव परिसरात गुरुवारी (ता. ११) सकाळी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने छापा टाकल्याने गावात खळबळ उडाली. मोहल्ल्यातील एका घरावर ही कारवाई करण्यात येत असून, परिसरात मोठ्या प्रमाणात ईडी अधिकारी, तसेच पोलिसांचे जाळे तैनात करण्यात आले आहे. ईडीकडून संबंधित घरात तपासणी आणि चौकशी सुरू आहे; मात्र अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.