

ED Action In Mumbai
ESakal
मुंबई : दोन सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअरच्या किमतीत कथित फेरफार करून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (ता. १६) महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये विविध ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणात एक लाखाहून अधिक छोट्या गुंतवणूकदारांचे नुकसान झाल्याचा ईडीचा प्राथमिक अंदाज आहे.