मित्राला संदेश पाठवून अभियंत्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मार्च 2017

माथेरान - उल्हासनगरचा रहिवासी असलेला राजेंद्र शाहू (वय 26) या अभियंत्याने येथील दरीत उडी मारून आत्महत्या केली. तो खासगी कंपनीत कामाला होता. 

माथेरान - उल्हासनगरचा रहिवासी असलेला राजेंद्र शाहू (वय 26) या अभियंत्याने येथील दरीत उडी मारून आत्महत्या केली. तो खासगी कंपनीत कामाला होता. 

राजेंद्रने रविवारी (ता. 12) आपला मित्र अभिषेक यास संदेश पाठवला. "आपण जिवाला कंटाळून माथेरान येथे आत्महत्या करत आहे. हा निरोप माझ्या वडिलांना दे,' असे त्यात म्हटले होते. यावरून राजेंद्रच्या वडिलांनी माथेरान पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तत्काळ यंत्रणा हलवून शोध सुरू केला. सोशल मीडियावर राजेंद्रचे छायाचित्र व माहिती टाकली. सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी केली. अलेक्‍झांडर पॉइंटकडील दरीत सोमवारी सहायक पोलिस निरीक्षक महादेव आचरेकर व उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे उतरले. साधारण 1500 फूट खोल जाऊनही काहीच तपास लागला नाही. स्थानिक आदिवासींच्या मदतीने दिवसभर शोध घेतल्यावर 1800 फूट खोल दरीत राजेंद्रचा छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह सापडला.

Web Title: Engineers suicide