"तेजस एक्‍स्प्रेस'ने घेता येणार सहलीचा आनंद; पर्यटनाला 15 डिसेंबरपासून सुरुवात

"तेजस एक्‍स्प्रेस'ने घेता येणार सहलीचा आनंद; पर्यटनाला 15 डिसेंबरपासून सुरुवात


मुंबई : मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या खासगी तेजस एक्‍स्प्रेसला सध्या फक्त 25 ते 40 टक्केच प्रवाशांची पसंती मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढण्याबरोबरच पर्यटनाला चालना मिळावी म्हणून तेजस एक्‍सप्रेसमध्ये विशेष पॅकेजची सुविधा देण्याचा निर्णय आयआरसीटीसीने घेतला आहे. 3 ते 5 दिवसांच्या पॅकेजमध्ये दोन प्रकार असणार आहेत. येत्या 15 डिसेंबरपासून त्याची सुरुवात होणार आहे. 

लॉकडाऊन काळानंतर 17 ऑक्‍टोबरपासून तेजस एक्‍स्प्रेस पुन्हा सुरू करण्यात आली. दरम्यान, सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन करत, एकूण क्षमतेच्या 60 टक्के आसने आरक्षणासाठी सध्या उपलब्ध आहेत. त्याशिवाय "तेजस'ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सॅनिटाईज किट दिल्या जात असल्याची माहिती आयआरसीटीच्या पश्‍चिम विभागाचे ग्रुप जनरल मॅनेजर राहुल हिमालयन यांनी दिली. कोरोनामुळे नागरिकांची झालेली मानसिकता बदलण्यासाठी तेजस एक्‍स्प्रेसला पॅकेजची जोड देण्यात येत असल्याचेही हिमालयन यांनी स्पष्ट केले. 

"तेजस'च्या पॅकेजमध्ये वडोदरा आणि अहमदाबाद शहरांतील ऐतिहासिक स्थळांचे पर्यटन करता येणार आहे. त्यामध्ये चेअर कार आणि वातानुकूलित तृतीय डब्याचा समावेश असेल. तीन रात्र चार दिवसांच्या सहलीकरिता एका प्रवाशाला 10 ते 12 हजार रुपये मोजावे लागतील. चार रात्र पाच दिवसांच्या सहलीसाठी एका प्रवाशाला 13 ते 15 हजार रुपये खर्च येईल. 15 डिसेबंरपासून प्रवाशांना पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे. 

गोल्डन चॅरियेट ट्रेनच्या प्रवासात सवलत 
आयआरसीटीसीने गोल्डन चॅरियेट ट्रेनच्या प्रवाशांना विशेष सवलत दिली आहे. ट्रेनची पहिली फेरी 17 जानेवारी 2021 रोजी बंगळुरू येथून रवाना होणार आहे. त्यामध्ये प्राईड ऑफ कर्नाटक विथ गोवा आणि ज्वेल्स ऑफ साऊथ अशा दोन पॅकेजमध्ये 6 रात्र आणि 7 दिवसांसाठी देशी पर्यटकांना 50 टक्के सवलत देण्यात आल्याने केवळ 59 हजार 999 रुपयांत ही सहल करता येणार आहे. तसेच यात ग्लिंप्स ऑफ कर्नाटक या पॅकेजचाही समावेश आहे.

Enjoy the trip with Tejas Express Tourism starts from 15th December

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com