मुंबईतील रस्त्यांवर सुरूये... ‘हा’काळाबाजार!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

कोरोनामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर सुरू केल्याने मुंबईतील रस्त्यावर त्याचा काळाबाजार सुरू  झाल्याचे पाहावयास मिळत आहे. सीएसएमटी, दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर इत्यादी रेल्वेस्थानक परिसरात २० ते ३० रुपयांना मास्क मिळत आहेत.

मुंबई : कोरोनामुळे धास्तावलेल्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर सुरू केल्याने मुंबईतील रस्त्यावर त्याचा काळाबाजार सुरू  झाल्याचे पाहावयास मिळत आहे. सीएसएमटी, दादर, कुर्ला, अंधेरी, घाटकोपर इत्यादी रेल्वेस्थानक परिसरात २० ते ३० रुपयांना मास्क मिळत आहेत. दोनच दिवसांपूर्वी बनावट मास्क बाजारात आले आहेत. विशेष म्हणजे, एका विक्रेत्याकडून दिवसाला साधारण सव्वाशे ते दीडशे मास्क विकले जात आहेत.

ही बातमी वाचली का? आम आदमी पक्षाकडून‘ही’घोषणा; उतरणार मैदानात...

मुंबईत मागणीपेक्षा तुटवडा असल्याने बनावट मास्कविक्री खुलेआम सुरू झाली आहे. धारावी, वरळी, कुर्ला आदींसारख्या परिसरांमध्ये बनावट मास्क बनवणारे कारखाने रातोरात सुरू झाले आहेत. अशा कारखान्यांमध्ये साधा स्पंज आणि रबराचा वापर करून मास्क बनवले जात आहेत. अशा मास्कची गुणवत्ता सुमार दर्जाची असल्याने त्यांच्यापासून कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून व्यक्ती सुरक्षित राहू शकत नाही.

ही बातमी वाचली का? मिलिंद एकबोटे राज ठाकरेंच्या भेटीला! वाचा भेटीमागील कारण...

‘एन ९५’ मास्कचे वैशिष्ट्य

  •  एनआयओएसएच (दी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲक्‍युपेशनल सेफ्टी ॲण्ड हेल्थ) प्रमाणित.
  •  जंतुरोधक फिल्टर प्रणाली असल्याने कोणत्याही प्रकारचे जंतू बाहेरून आत किंवा आतून बाहेर जात नाहीत.
  •  मास्कमध्ये तीन प्रकारचे पडदे असल्याने कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून संरक्षण होते.
  •  मास्कची पकड घट्ट असल्याने तो तोंडावर व्यवस्थित बसतो.

ही बातमी वाचली का? डेटॉलने हात धुतल्याने कोरोनाचे विषाणू मरतात? 

कोरोना संसर्गाची नागरिकांमध्ये भीती पसरल्याने मास्कची मागणी वाढली आहे. मुंबईत दिवसाला दोन लाखांहून अधिक मास्कची गरज आहे. मात्र, दिवसाला केवळ एक लाख मास्कचा पुरवठा करू शकतो.
- दीपक दवे, माजी अध्यक्ष, मेडिकल ॲण्ड सर्जिकल हेल्थ केअर इंडस्ट्री ट्रेड असोसिएशन.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fake 'N90' mask available for 30 rupees in mumbai!

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: