'ते' ही लहान, 'तो' नऊ वर्षांचा; त्यांनी पॉर्न पाहून त्याला नेलं जवळच्या झुडपात...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

मुंबई - मोबाईलवर पाच अल्पवयीन मुलांनी पॉर्न पाहून नऊ वर्षांच्या मुलावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना टिळकनगर परिसरातील जय हनुमान नगरमध्ये घडली. यातील सर्व मुले नऊ ते 16 वयोगटातील असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. 

मुंबई - मोबाईलवर पाच अल्पवयीन मुलांनी पॉर्न पाहून नऊ वर्षांच्या मुलावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना टिळकनगर परिसरातील जय हनुमान नगरमध्ये घडली. यातील सर्व मुले नऊ ते 16 वयोगटातील असून, त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. 

जय हनुमाननगरात राहणाऱ्या पाच अल्पवयीन मुलांना अनेक वर्षांपासून मोबाईलवर पॉर्न पाहण्याची सवय लागली होती. या पाचही मुलांनी रविवारी संध्याकाळी 6 वाजता त्याच परिसरातील मदर डेअरीजवळील बुद्ध हारसमोर खेळणाऱ्या एका 9 वर्षीय मुलाला पकडून जवळच्या झुडपात घेऊन जाऊन त्याच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कोणालाही काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्यांनी पीडित मुलाला दिली.

मोठी बातमी - जेम्सने रात्री राबियाकडे तिचा मोबाईल मागितला, तिने थेट नकार दिला; पुढे जे घडलं...

सोमवारी सकाळी पीडित मुलाचे गुदद्वार खूपच दुखत असल्याने त्याच्या आईने शाळेत जाऊन सकाळी 10.30 वाजता त्याला घरी आणले. पीडित मुलाने त्याच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार त्याच्या शेजारीच राहणाऱ्या आत्याला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तसेच दोषी अल्पवयीन मुलांनी सोमवारी पुन्हा पीडित मुलाला पकडून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला; मात्र पीडित मुलाने नकार दिल्याने त्याला मारहाण झाल्याचे त्याने सांगितले. 

मोठी बातमी - पोलिसांचं काम झालं कमी, आलं कोरोनाचे रुग्ण ओळखणारं विशेष हेल्मेट

मुलाच्या आई-वडिलांनी तत्काळ नेहरूनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्या पाच आरोपी मुलांना पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर कलम क्रमांक 377, 323, 506, 34, 4, 6,10 अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली. पीडित मुलाला मंगळवारी वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात येणार असून नेहरूनगर पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

mumbai police arrested five juvenile children for improper behavior with 9 year old 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai police arrested five juvenile children for improper behavior with 9 year old