नवमतदारांमध्ये उत्साह; समाजमाध्यमांवर सेल्फी
नवमतदारांमध्ये उत्साह; समाजमाध्यमांवर सेल्फी

नवमतदारांमध्ये उत्साह; समाजमाध्यमांवर सेल्फी

नवी मुंबई : नवी मुंबईतील बेलापूर व ऐरोली मतदारसंघातील नवमतदारांमध्ये चांगला उत्साह दिसून आला. विशेष म्हणजे प्रथमच मतदान करताना काही नवमतदारांनी सकाळी सात वाजताच आपला मतदानाचा अधिकार बजाविला. त्यानंतर नेहमीप्रमाणे सेल्फी काढून समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यात आले.

नवी मुंबईतील दोन्हीही मतदारसंघांत या वर्षी २४ हजारांच्या आसपास १८ वर्षेपेक्षा जास्त वयातील मतदारांची नोंद झाली. पहिल्यांदा मतदार करण्यासाठी त्यांच्यात चांगलाच उत्साह दिसून आला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

जीवनात प्रथमच मतदान केले. यापुढे आपल्या देशातील लोकशाही टिकवण्यासाठी व प्रबळ करण्यासाठी सर्व निवडणुकांत मतदान करण्यासाठी जाणार आहे. विशेष म्हणजे पालकांनी कोणाला मतदान करावे, हे सांगितले नाही. इच्छेनुसार आवडत्या उमेदवाराला मतदान केले.
- सूचित देशमुख, ऐरोली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com