

Mumbai Thane to Mulund Water Tunnel
ESakal
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेला (BMC) त्यांच्या महत्त्वाकांक्षी २१ किमी लांबीच्या जल बोगद्याच्या प्रकल्पासाठी कोस्टल रेग्युलेशन झोनकडून मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे मुंबईत पाण्याची उपलब्धता वाढेल. भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण होईल. बीएमसीने २१ किमी लांबीचा हा बोगदा प्रकल्प बॅकअप प्लॅन म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. बीएमसीचा महत्त्वाकांक्षी २१ किमी लांबीचा जल बोगदा प्रकल्प ठाण्यातील येवई आणि कशेळी यांना पूर्व उपनगरातील मुलुंडशी जोडेल.