esakal | आरेमधील वृक्षतोड केलेल्या भकास जागेवर वृक्षारोपण करा, पर्यावरणप्रेमींची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

आरेमधील वृक्षतोड केलेल्या भकास जागेवर वृक्षारोपण करा, पर्यावरणप्रेमींची मागणी

मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने आरे कारशेड प्रकल्पासाठी 2,135 झाडे तोडली...

आरेमधील वृक्षतोड केलेल्या भकास जागेवर वृक्षारोपण करा, पर्यावरणप्रेमींची मागणी

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) ने आरे कारशेड प्रकल्पासाठी 2,135 झाडे तोडली. याची भरपाई म्हणून आरेकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. मात्र ज्या आरेमधील झाडे तोडण्यात आली ती जागा भकास झाली आहे. त्या जागेवर पुन्हा झाडे लावण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
एमएमआरसीएलने आपल्या प्रकल्पांसाठी तोडलेल्या झाडांचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार 2020 च्या सप्टेंबरच्या अखेरच्या दिवसांत, एमएमआरसीएलने 1406 झाडे कापली गेली आहेत. त्याची भरपाई म्हणून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 20,990 च्या आसपास झाडे तर 3090 वृक्षांची लागवड मुंबईत इतर ठिकाणी केली आहे.

एमएमआरसीएलने आरे कारशेडसाठी 2 तासांत 2,135 झाडांवर कु-हाड चालवली. ती जागा आजही रिकामी असून कारशेड स्थलांतरीत झाल्यानंतर त्या जागेवर झाडे लावण्याबाबत अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे त्या जागेवर मियावाकी वन संकल्पना राबविण्याचे मुख्यमंत्री तसेच पर्यावरण मंत्री यांना पर्यावरणप्रेमींना आवाहन वॉचडॉग फाऊंडेशनने केले आहे. मियावाकी अंतर्गत 50 एकर भूखंडावर 6 लाख वृक्ष लागवड शक्य असल्याचे ही त्यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : 21 दिवसात 82 हजार नागरिकांनी भरला दंड, विनामास्क बाहेर निघाल तर पुढचा नंबर तुमचा

मुंबई महानगरपालिकेने 35 कोटी रुपये खर्चून महत्वाकांक्षी मिआवाकी वन प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पात लॉकडाऊन दरम्यानच्या सहा महिन्यात यश ही मिळाले. मियावाकी वृक्षारोपण तंत्राचा वापर करून अनेक छोटी वने तयार केली गेली आहेत, एक एकर क्षेत्रात 12 हजार रोपट्यांचा समावेश आहे. थोड्याच कालावधीत मुळ वृक्ष लागवडीच्या माध्यमातून मुंबईत झाडांची संख्या वाढू शकते असे वॉचडॉग फाऊंडेशनचे गॉडफ्राय पिंपेटा यांनी सांगितले.

महत्त्वाची बातमी : ठाणेकरांच्या स्वतंत्र धरणासाठी शिवसेनेला जाग येईल का? भाजपची खरमरीत टीका 

MMRCL कडे आरेमधील 30 हेक्टर भूखंड आहे. आरे येथे नमूद केलेल्या क्षेत्रापैकी सुमारे एक एकर जमीन प्रशासकीय कार्यालय इमारत, स्टाफ क्वार्टर आणि इलेक्ट्रिक सब स्टेशन इत्यादींसाठी वापरली तरी बरीच जागा शिल्लक राहील. या जागेचा वापर मियावाकी फॉरेस्टच्या अंमलबजावणीद्वारे केला जाऊ शकतो. मेट्रो कार शेडच्या एक एकर जागेवर एमएमआरसीएलमने जर एक एकर भूखंडामध्ये 12 हजार झाडे लावली गेली तर 50 एकर भूखंडात कमी कालावधीत सुमारे 6 लाख झाडे वाढू शकतात. यातून एकाच ठिकाणचे शहरातील सर्वात मोठे वृक्ष वनस्पतींपैकी एक असेल असा विश्वास ही पिंपेटा यांनी व्यक्त केला.

( संपादन - सुमित बागुल )
environmentalist demands tree plantation on the earlier aarey crashed site