शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रम

संजीत वायंगणकर
मंगळवार, 23 जानेवारी 2018

डोंबिवली : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जंयतीनिमित्त डोंबिवलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. पश्चिमेकडील द्वारका चौकात उपशहरप्रमुख किशोर मानकामे व  जैन ग्रुप यांच्या सांयुक्त विद्यमाने दिव्यांग मुलांना मोफत व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यापूर्वी  शिवसेना शहर शाखेच्यावतीने विद्यार्थ्यांनी काढलेल्या सायकल रॅलीत पर्यावरण आणि आरोग्यविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच शिवसेना मध्यवर्ती शाखेत आधारकार्ड आणि पॅनकार्ड शिबीर भरविण्यात आले होते. कोपर गाव व ठाकुर्ली  शाखेतही आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जंयतीनिमित्त डोंबिवलीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी अभिवादन केले. सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी सायकल फेरी काढून डोंबिवली पूर्व व पश्चिमेस जनजागृती केली. त्यानंतर डोंबिवली पश्चिमेकडील स्टेशन बाहेरील परिसरात शिवसेना उपशहरप्रमुख किशोर मानकामे यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्थायी समितीचे माजी सभापती  रमेश म्हात्रे यांच्या हस्ते मित केणे , यश आंब्रे, हेमंत बाणे , भावेश चव्हाण ,जैनील तन्ना , जागृती पवार या दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत व्हीलचेअर वाटप करण्यात आले. यावेळी सभागृह नेते तथा शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, परिवहन समिती सभापती संजय पावशे, नगरसेविका संगीता पाटील, माजी नगरसेवक तात्या माने, रामदास पाटील,परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण,शाखाप्रमुख शाम चौगुले यासह महिला पदाधिकारी कविता गावंड, किरण मोंडकर, शाखाप्रमुख तुषार शिंदे, गोट्या सावंत, उपशाखाप्रमुख प्रकाश देसाई, पप्पू नलावडे, धनाजी चौधरी, गोविंद कुलकर्णी , रश्मी कराळे, कीर्ती महिडा यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी शिवसेना शहर शाखेच्या वतीने काढण्यात आलेल्या सायकल रॅलीत विद्यार्थ्यांनी सायकल चालवा - प्रदूषण टाळा, सायकल चालवा- तंदुस्त रहा , झाडे लावा –झाडे जगवा , स्वच्छ डोंबिवली – सुंदर डोंबिवली असे सायकलीवर फलकलावून जनजागृती केली.स्थायी समितीचे माजी सभापती  रमेश म्हात्रे यांच्या हस्ते सायकल रॅलीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. शिवसेना उपशहरप्रमुख किशोर मानकामे हे हिंदुहृद्यसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जंयतीनिमित्त अपंग विद्यार्थ्यांना दरवर्षी मोफत व्हीलचेअर वाटप करत असल्याबद्दल उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले. 
 
Web Title: esakal marathi news balasaheb thakre birth anniversary