मुंबई | शिक्षकांना अॉफलाईन पगार मिळणार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

मुंबई : शालार्थ संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणीमुळे यंदा जानेवारीचा पगार शिक्षकांना अॉफलाईन पद्दतीने दिला जाणार आहे. गुरूवारी रात्री उशिरा शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केला.

शिक्षकांचा वाढता रोष लक्षात घेता शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला. फेब्रुवारीच्या दहा तारखेपर्यंत अॉफलाईन पगार नाही मिळाला तर  तर जोरदार आंदोलन उभारले जाईल, असा इशारा डेमोक्रेटिक टीचर्स फ्रंटचे अध्यक्ष जनार्दन जांगले यांनी दिला होता.

हा प्रकर जाणूनबुजून केल्याचा आरोप टीडीएफच्या जांगले यांनी केला. हा प्रकारातून शिक्षण विभाग दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोपही जांगले यांनी केला. मुंबई जिल्हा बॅंकेत खाती उघडण्यासाठी शिक्षकांवर दबाव आणण्यासाठी शिक्षण विभागाने हा प्रकार जाणूनबुजुन केल्याचे ते म्हणाले. येत असल्याचेही ते म्हणाले.राज्य मुख्याध्यापक संघटनेनेही शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे यांची पुण्यात भेट घेऊन ऑफलाईन पगार त्वरित दिला जावा, अशी मागणी केली होती. दरम्यान, शालार्थ संकेतस्थळाच्या योग्य अंमलबजावणीसाठी संगणक साहित्याबाबतची माहिती शिक्षण विभागाने गुरुवारी सायंकाळी सरकारी अध्यादेशाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली. शिक्षण गेल्या तीन आठवड्यांपासून पगाराच्या मागणीसाठी सरकारी उंबरठे झिजवत असताना संकेतस्थळाच्या योग्य अंमलबजावणीचे शहाणपण उशिराने कसे सूचते, असा संतप्त सवालही काही शिक्षक संघटनांनी विचारला.

Web Title: esakal marathi news mumbai teacher offline payment