केडीएमटीसाठी बजेट मध्ये तरतूद केलेला निधी दया ; कल्याण डोंबिवली मनपा परिवहन सदस्यांचे पालिका आयुक्तांना साकडे

रविंद्र खरात 
बुधवार, 19 जुलै 2017

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या वार्षिक अंदाज पत्रकात केडीएमटीला अनुदानासाठी प्रति महीना दीड कोटी रूपयांची तरतूद केली आहे मात्र पालिका केवळ एक कोटी रुपये देते, ते ही वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा पगार ही वेळेवर निघत नाही आपण याबाबत लक्ष्य घालावे यासाठी कल्याण डोंबिवली मनपा परिवहन समिती सदस्यांनी आज बुधवार ता 19 जुलै रोजी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांची भेट घेत साकडे घातले .

कल्याण- कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या वार्षिक अंदाज पत्रकात केडीएमटीला अनुदानासाठी प्रति महीना दीड कोटी रूपयांची तरतूद केली आहे मात्र पालिका केवळ एक कोटी रुपये देते, ते ही वेळेवर मिळत नसल्याने कर्मचारी आणि अधिकारी वर्गाचा पगार ही वेळेवर निघत नाही आपण याबाबत लक्ष्य घालावे यासाठी कल्याण डोंबिवली मनपा परिवहन समिती सदस्यांनी आज बुधवार ता 19 जुलै रोजी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांची भेट घेत साकडे घातले .

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात प्रति महिना केडीएमटी साठी दिड कोटी रुपये अनुदान देण्यासंबधी तरतूद करण्यात आली आहे, मात्र पालिका प्रशासन प्रति महिना केवळ एक कोटी देते मात्र तेही वेळेवर देत नसल्याने केडीएमटी कर्मचारी अधिकारी वर्गाचा पगार काढ़ण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते , अशी समस्या परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण, राजेंद्र दिक्षित, शैलेंद्र भोईर, मनोज चौधरी, कल्पेश जोशी, प्रसाद माळी, मधुकर यशवंतराव, संजय राणे आदी सदस्यांनी पालिका आयुक्त पी. वेलरासु यांच्याकड़े मांडली . 

पालिका आयुक्त पदाचा पदभार घेत कामकाजाला पी. वेलरासु यांनी सुरुवात केली आहे. आज बुधवार (ता .19 जुलै) रोजी परिवहन समिती सदस्यांनी पालिका आयुक्त पी वेलरासु यांचे स्वागत करत केडीएमटी च्या समस्या मांडल्या, कल्याण मधील गणेश घाट मध्ये भंगार बसेस उभ्या असल्याने नवीन बसेस रस्त्यावर उभ्या कराव्या लागतात त्यामुळे भंगार बसेस दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात याव्या, उपन्न वाढीसाठी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घ्यावी आदी मागण्या केल्या. केडीएमटी अधिकारी वर्गाची बैठक घेवून माहिती घेतो, तदनंतर प्रत्येक महिन्यात आढावा बैठक घेण्याचे ठरवू, असे आश्वासन पालिका आयुक्त पी वेलरासु यांनी सदस्याना दिले .

निधी मिळावा, समस्या दूर व्हावी यासाठी पालिका आयुक्त पी वेलरासु यांची भेट घेतली ,त्यांनी आमच्या मागण्या मान्य करत लवकरच तोड़गा काढू असे आश्वासन दिल्याची माहिती परिवहन समिती सदस्य संतोष चव्हाण यांनी दिली . 

 

Web Title: esakal news sakal news kalyan news kdmt news