मंत्रालयासमोर व्हिआयपी गाड्यांची मनमानी पार्किंग ; बेस्ट कर्मचाऱ्यांची कारवाईची मागणी

दिनेश चिलप मराठे
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई : मंत्रालय येथील बेस्ट बसस्थानकासमोर होणाऱ्या अनधिकृत आणि बेशिस्त व्हिआयपी गाड्या पार्किंगवर कठोर कार्रवाई व्हावी आणि बेस्ट बसेस उभ्या करण्यासाठी आरक्षित जागा मोकळी करुन द्यावी अशी संतप्त मागणी बेस्टचे वाहक, चालक आणि प्रवर्तक यांनी केलेली आहे. 

बेस्ट बस निरीक्षक प्रेमानंद याद व बस प्रवर्तक जी.एस. कदम, अंकुश माने, तानाजी फुलवडे हे बेस्ट बससाठी आरक्षित जागेवर असलेल्या व्हिआयपी गाड्या हटवण्याचा प्रयत्न करत असताना वाहन चालक मात्र त्यांचे ऐकण्यास तयार नव्हते. गाड्यांची बिन दिक्कत पार्किंग केलेले चालक गाड्या काढण्यास तयार नव्हते. अशा घटना या भागात नेहमी घडतात. त्या गाड्या काढण्यासाठी माईक वरून वारंवार विनंती करूनही पार्किंग करणारे वाहन चालक त्यांना दाद देत नाहीत तर उलट भांडायला उठतात. 'नो पार्किंग' चा बोर्ड असतानाही येथे पार्किंग सर्रास केली जाते.

या संदर्भात कुलाबा ट्राफिक पोलिस कधी कारवाई करतात तर कधी व्हिआयपी गाड्या असल्याने कारवाई  करण्याचे टाळतात. 'या मंत्र्यांच्या गाडया आहेत, कोण आणि कशी कारवाई करतो ते पाहू' असे उद्धटपणे बोलत वाहनचालक पार्किंग करतात. 

दररोज मंत्रालयात येणाऱ्या लोकांच्या या गाड्या अशा बेशिस्तपणे पार्क करत असल्यामुळे आम्हाला या सर्वांचा त्रास होतो असे प्रवासी, बेस्ट ड्रायव्हर आणि कंडक्टर यांचे म्हणणे आहे.

Web Title: esakal news sakal news mumbai news mantralay news no parking