मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा अपघात ; एका ट्रक चालकाचा मृत्यू

नीरज राऊत                  
शुक्रवार, 21 जुलै 2017

आज पहाटे 5 वाजल्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कुडे एक कंटेनर घेऊन जाणाऱ्या ट्रकला किशोर ट्रान्सपोर्ट सर्विस कंपनीच्या वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या अपघातांनंतर दोन्ही वाहनांना आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे पाचारण करण्यात आली. मात्र आग विझविण्यापूर्वी धडक देणाऱ्या ट्रकच्या चालकाचा या आगीत मृत्यू झाला.

पालघर - मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर जवळील 'कुडे' गावालगत दोन ट्रक मध्ये अपघात होऊन एका ट्रक चालकाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक पाच तास ठप्प होती.

आज पहाटे 5 वाजल्याच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील कुडे एक कंटेनर घेऊन जाणाऱ्या ट्रकला किशोर ट्रान्सपोर्ट सर्विस कंपनीच्या वाहनाने मागून जोरदार धडक दिली. या अपघातांनंतर दोन्ही वाहनांना आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे पाचारण करण्यात आली. मात्र आग विझविण्यापूर्वी धडक देणाऱ्या ट्रकच्या चालकाचा या आगीत मृत्यू झाला. हा चालक अहमदाबाद येथील ड्राइवर पुरविणाऱ्या एजन्सीचा असल्याने त्याची ओळख पटली नाही.

या अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली. काही वाहने विरुद्ध दिशेने शिरल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने पोलिसांच्या मदतीने बाजूला केल्यानंतर पाच तासांनी मुंबई कडील वाहतूक सकाळी 10 वाजल्यानंतर सुरू झाली. अपघातग्रस्त ट्रकच्या चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

     

Web Title: esakal news sakal news mumbai news mumbai ahmadabad national highway news accident news