esakal | मुंबई : पश्चिम रेल्वेचा मालवाहतूकीमध्ये विक्रम | Western Railway
sakal

बोलून बातमी शोधा

Western Railway

मुंबई : पश्चिम रेल्वेचा मालवाहतूकीमध्ये विक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशभरात अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंचा (Essential Goods) पुरवठा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवरून (western railway) वेगाने मालवाहतूक सुरू आहे. ‘हंगरी फॉर कार्गो’ (hungry for cargo) या संकल्पनेनुसार चालू आर्थिक वर्षात केवळ सहा महिन्यांत पश्चिम रेल्वेने ५ हजार कोटींचा महसूल (Income) गोळा केला आहे.

हेही वाचा: मुंबई : प्रत्येक महाविद्यालयात‘आयडॉल’चे उपकेंद्र

पश्चिम रेल्वेने मीठ, सिमेंट, कोळसा, कंटेनर, ऑटोमोबाईल, जिप्सम, बॉक्साईट, सोडा अशा वस्तूंची लोडिंग करण्यात आली. स्थानिक आणि विभागीय स्तरावर रेल्वेने स्थापन केलेल्या बिझनेस डेव्हलपमेंट युनिटचा (बीडीयू) भाग म्हणून पश्चिम रेल्वेने उद्योगांना सुविधा उपलब्ध केली. त्यामुळे रेल्वेकडे अनेक नवे वाहतूकदार आकर्षित झाले असून यंदा ३३२.८६ कोटी रुपयांचा जादा महसूल मिळाला आहे. चालू आर्थिक वर्षात महसूल वाढविण्यासाठी रो-रो सेवेसह अन्य सुविधा देण्याची योजना तयार करण्यात आली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिली.

loading image
go to top