दिवाळीनिमित्त लहानग्यांकडून किल्ले सिंधुदुर्गची स्थापना, महाराजांच्या आठवणींना उजाळा

किल्ला शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला असेल तर हा योग काय वर्णावा.
Mumbai
MumbaiSakal
Updated on

मुंबई : दिवाळीचा सण म्हणजे सर्व बाळगोपाळांना आणि मोठ्यांनाही आनंदाचा सोहळा असतो. अशा या आनंदाच्या सोहळ्यात “दिवाळी किल्ला” बनवणे ही तर मोठी पर्वणीच असते. आणि जर का हा किल्ला शिवरायांचा ऐतिहासिक किल्ला असेल तर हा योग काय वर्णावा.

असाच एक किल्ला साकार साकारलाय मुंबईतील सांताक्रूझ येथील सप्तवीर शिवतरुण मंडळाच्या लहान मुलांनी. गेल्या पाच वर्षांपासून यंदा ही या मुलांनी आपली परंपरा कायम ठेवत किल्ला बनवण्याचा आनंद लुटला. तब्बल 11 दिवसांच्या कालावधीत दिवस रात्र थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी एक सिंधुदुर्ग किल्ला या मुलांनी साकारला आहे.

स्वराज्याची शिवलंका किल्ले सिंधुदुर्ग असे नावही देण्यात आले आहे. फक्त किल्ला साकारायचा आणि दिवाळीची मजा करायची असा संकल्प न ठेवता अगदी अभ्यास करुन बारीक सारीक गोष्टींचा विचार करत समजून नकाशाचा वापर करत हुबेहूब किल्ला या मुलांनी साकारला आहे.

किल्ल्याची तटबंदी, बाजूला असलेले झाड या आणि अशा बर्‍याच गोष्टी किल्ल्यात दाखवण्यात आल्या आहेत.

Mumbai
आर्यन खान प्रकरणाचा तपास संजय सिंह करणार ; जाणून घ्या कोण आहेत

किल्ला तयार करणारी मुले ही 10 ते 14 वर्षे वयोगटातील आहेत. याआधीही या मंडळातील मुलांनी अशा प्रकारचे किल्ले साकारले आहेत पण, यावर्षी किल्ले सिंधुदुर्ग या मुलांनी बनवण्याचा निर्णय घेतला. आणि पुढच्या दोन दिवसांत किल्ल्यासाठी लागणारी सर्व सामग्री या मुलांना पुरवण्यात आली. सिंधुदुर्ग किल्ल्याचा नकाशा आधी तयार करुन घेण्यात आला. त्यानंतर, वीट , माती, रंगाचा वापर करत 11 दिवसांत हा किल्ला बनवण्यात आला.

Mumbai
बेडरुमच्या रंगाचा सेक्स लाइफशी संबंध, कसा ते जाणून घ्या?

दिवाळीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच 4 नोव्हेंबरला या किल्ल्याचे उद्घाटन केले गेले आणि नागरिकांना पाहण्यासाठी खुला केला गेला. किल्ले बनवताना मुलांचा उत्साह हा पाहण्यासारखा होता. मुलं रात्र भर कंटाळा न करता किल्ला तयार करायचे. यातुन परंपरा जपली जाते आणि मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो असे मंडळाचे सदस्य सागर गावडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com