इथिक कमिटीचा हिरवा कंदील मिळाला, KEM मध्ये कोविशील्डच्या चाचण्या होणार सुरु

भाग्यश्री भुवड
Wednesday, 23 September 2020

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या आणि सिरम इन्स्टिट्यूटमार्फत उत्पादन करत असलेल्या या लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या जगभरात सुरू आहेत.

मुंबई : कोरोनावरील लसीच्या मानवी चाचणीचा दुसरा आणि तिसरा टप्पा मुंबईतील पालिकेच्या केईम आणि नायर रुग्णालयात होणार आहे. त्यापैकी केईएम रुग्णालयातील कोविशील्डच्या ट्रायलसाठी इथिक कमिटीचा हिरवा कंदील मिळाला आहे अशी माहिती केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.

महत्त्वाची बातमी : अनाथ मुलांना पुन्हा रस्त्यावर येण्याची वेळ, वसतिगृह सोडण्याची नोटीस आल्याने विद्यार्थिनी हवालदिल

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने तयार केलेल्या आणि सिरम इन्स्टिट्यूटमार्फत उत्पादन करत असलेल्या या लशीच्या अंतिम टप्प्यातील मानवी चाचण्या जगभरात सुरू आहेत. इंग्लंडमधील स्वयंसेवकांवर विपरीत परिणाम जाणवू लागल्याने तेथील चाचण्या काही दिवसांसाठी थांबवण्यात आल्या होत्या. मात्र, आता मुंबईत ही लवकरच क्लिनिकल ट्रायल केली जाईल असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी या पूर्वीच सांगितले. 

महत्त्वाची बातमी : निर्गुडी, महाराष्ट्रात आढळणारं एक असं झाड ज्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

देशभरातील 10 सेंटरपैकी मुंबईतील केईएम हॉस्पिटल आणि नायर रुग्णालयाची चाचणीसाठी निवड करण्यात आली आहे. कोविशिल्ड वॅक्सिन असे या लसीचे नाव असुन देशभरातील 10 सेंटरमध्ये एकूण 1600 निरोगी लोकांवर लसीची एकाच वेळी चाचणी घेतली जाणार आहे. मुंबईच्या केईएम रुग्णालयामधील 100 (निरोगी लोक) स्वयंसेवकांवर लसीची चाचणी होणार असल्याचे डॉ देशमुख म्हणाले.

ethic committee gives permission to conduct covishield trials in KEM


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ethic committee gives permission to conduct covishield trials in KEM