esakal | निर्गुडी, महाराष्ट्रात आढळणारं एक असं झाड ज्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे
sakal

बोलून बातमी शोधा

निर्गुडी, महाराष्ट्रात आढळणारं एक असं झाड ज्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

निर्गुडीची उंची साधारण सडे चार ते सहा मीटर एवढी असते. हे झुडूप मुख्यत्वे महाराष्ट्रातील दख्खन कोकण भागात आढळतं.

निर्गुडी, महाराष्ट्रात आढळणारं एक असं झाड ज्याचे आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : कोरोनामुळे जगभरात अनेक औषधांवर संशोधन सुरु आहे. कोरोनामुळेच आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती किती महत्त्वाची असते हे ही एव्हाना पटलंय आणि आपण त्या दृष्टीने विचारही करायला लागलोय. या सर्वांमुळे आयुर्वेदाबद्दलही प्रचंड जनगागृती होताना पाहायला मिळतेय. या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला अशाच एका आयुर्वेदिक झुडुपाबद्दल सांगणार आहोत. ज्याचे आपल्या आरोग्यासाठी प्रचंड अनेक आहेत आणि याबद्दल अनेकांना माहिती नाही. 

निर्गुडी. निर्गुडी असं या झुडुपात नाव. निर्गुडीची उंची साधारण सडे चार ते सहा मीटर एवढी असते. हे झुडूप मुख्यत्वे महाराष्ट्रातील दख्खन कोकण भागात आढळतं. या शिवीय हे काही इतर देशांमध्ये म्हणजे श्रीलंका, अफगाणिस्थान आणि फिलिपिन्समधील काही प्रदेशनमध्ये देखील आढळतं.  

महत्त्वाची बातमीशरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, टोला लगावत म्हणालेत लवकरच उत्तर देणार

जाणून घेऊयात या झाडाची वैशिठ्ये :

 • या झाडाची खासियत म्हणजे हे झाड अगदी पडीक जागीही उगवतं. नद्या किंवा ओढे यांच्या काठावर हे निर्गुडीचं झाड आढळून येतं. 
 • या झाडाच्या खोडाची साल पातळ आणि करडी असते. तर कोवळे भाग लवदार असतात. 
 • याची पानं पांढरट आणि संमुख म्हणजेच एकमेकांच्या समोरासमोर   असतात 
 • पानांची खासियत म्हणजे ती लांब, भाल्यासारखी, फार क्वचित दातेरी आणि खालून पांढरट पण वरून गर्द हिरवी असतात.
 • त्याचं मुख्य देठ २·५ सेंमी. लांब असतो. 
 • या झाडाचा फुलोरा अग्रस्थ, शाखायुक्त परिमंजरी असून त्यावर लहान, निळसर पांढरी फुले येतात. पुढे या झाडाला फळं देखील येतात. 
 • साधारण ही फुलं ते 'मे'मध्ये येतात. 

काय आहे या झाडांचा उपयोग ? 
खरंतर या झाडांचा बागेत किंवा शोभेकरिता वापर होतो. या झाडाचं लाकूड कठीण असल्याने त्याचा जळणासाठी देखील वापर होतो. या झाडांच्या फांद्यांचा उपयोग हा टोपल्या किंवा खुप बनवण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात होतो. 

महत्त्वाची बातमीमुंबईत कोव्हिडची स्थिती चिंताजनक; तब्बल 33 लाख लोकं कंटेंन्मेंट झोनमध्ये; सहा महिन्यानंतर आकड्यांमध्ये घट नाही

निर्गुडीचे आरोग्यासाठीचे फायदे 

 • महत्त्वाची बाब म्हणजे या झाडात कफोत्सारक म्हणजेच कफ काढून टाकणारी, ज्वरनाशक आणि पौष्टिक घटक आढळून येतात. 
 • या झाडाची पानं ही कृमिनाशक, सुवासिक, पौष्टिक असून डोकेदुखीवर त्यांची पूड तपकिरीप्रमाणे ओढली जाऊ शकते. 
 • संधिवातात सांध्यांच्या सुजेवर आणि प्रमेहामुळे होणाऱ्या वृषणाच्या सुजेवर बांधण्यास किंवा गळवे निचरण्यास देखील या झाडाची पानं वापरतात.
 • या झाडाची शुष्क फळे कृमिनाशक असून पानांचा रस व्रणशुद्धीवर गुणकारी असतो. 
 • अभिधानमंजरी आणि राजनिघंटू या संस्कृत ग्रंथांत या वनस्पतीच्या गुणधर्मांविषयी उल्लेख आला आहे.

very common plant called nirgudi found in maharashtra has many medicinal benifits 

loading image