तृतीयपंथीयांना प्रवाहात आणणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - तृतीयपंथीयांना इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी एसएनडीटी दूरस्थ शिक्षण संस्थेतर्फे त्यांच्या वस्त्यांमध्ये जाऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. विलेपार्ले येथे एसएनडीटी कॉलेजमध्ये किन्नरमा संस्थेतर्फे झालेल्या कार्यक्रमात एसएनडीटीचे संचालक डॉ. चंद्रकांत पुरी यांनी ही माहिती दिली.

तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना शाळा शिकण्यात सामाजिक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेकदा त्यांना महाविद्यालयात प्रवेश नाकारला जातो, तसेच जगण्याच्या लढाईतही त्यांना शिक्षण घेणे शक्‍य होत नाही. त्यांना शिक्षण घेता यावे, यासाठी ते राहत असलेल्या वस्त्यांवर जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एसएनडीटी दूरस्थ शिक्षण संस्थेतर्फे पुढाकार घेण्यात येईल, अशी माहिती संचालक डॉ. चंद्रकांत पुरी यांनी दिली.

Web Title: eunuch education