मुंबई पालिकेनं सुरु केलेले संध्याकाळचे दवाखाने मार्च महिन्यापासून बंदच

समीर सुर्वे
Sunday, 25 October 2020

मुंबई महानगर पालिकेने शहरातील 15 दवाखाने संध्याकाळच्या वेळी सुरु केले होते. मात्र, मार्च महिन्यापासून हे दवाखाने बंदच आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून लहान मोठ्या आजारांसाठीही खासगी डॉक्टरांकडे पैसा खर्च करावा लागत आहे.

मुंबई: मुंबई महानगर पालिकेने शहरातील 15 दवाखाने संध्याकाळच्या वेळी सुरु केले होते. मात्र, मार्च महिन्यापासून हे दवाखाने बंदच आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून लहान मोठ्या आजारांसाठीही खासगी डॉक्टरांकडे पैसा खर्च करावा लागत आहे.

मुंबई महानगर पालिकेचे 180 हून अधिक दवाखाने हे सकाळच्या वेळी सुरु असतात. मात्र,आता कामाच्या वेळा बदलल्याने असल्याने संध्याकाळी डॉक्टरकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असते. त्यासाठी महानगर पालिकेने पहिल्या टप्यात 15 आणि दुसऱ्या टप्यात 35 दवाखाने संध्याकाळी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या टप्प्यातील 15 दवाखाने सुरु करण्यासाठी महानगर पालिकेने एका  खासगी संस्थेची करारही केला होता. या संस्थेमार्फत हे दवाखाने चालवले जाणार होते. मार्च महिन्यात हे दवाखाने सुरु ही झाले होते. मात्र,पुन्हा दवाखाने बंद झाले.

अधिक वाचा-  सर्व्हेच्या कामातून शिक्षकांची मुक्तता करा; ठाणे महापालिकेकडे मागणी

अंधेरी येथील न.जे वाडीया दवाखाना मार्चमध्ये बंद झाला त्यानंतर जून महिन्यात पुन्हा सुरु झाले. मात्र,नंतर थोड्याच दिवसात बंद झाले अशी माहिती असे अंधेरी पश्‍चिम येथील आमदार अमित साटम यांनी सांगितले. तशीच परिस्थिती या  15 दवाखान्यांची आहे.

अधिक वाचा-  आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा; संकेतस्थळावर शिल्लक असणाऱ्यांची यादी

मुंबईत 186 दवाखाने आणि 206 आरोग्य केंद्र आहेत. हे दवाखाने आणि आरोग्य केंद्र हे पालिकेच्या आरोग्य व्यस्थेचा पाया आहे. सुरुवाती पासूनच दवाखाने आरोग्य केंद्र फक्त सकाळच्या वेळी सुरु असायचे. मात्र,बदलत्या जीवनशैलीमुळे संध्याकाळीही दवाखाने सुरु ठेवण्याची गरज भासू लागले आहे. पालिकेचे दवाखाने संध्याकाळच्या वेळी सुरु नसल्याने गरीब गरजू रुग्णांना अनेक वेळा सर्दी, खोकला तापासारख्या किरकोळ आजारासाठी खासगी डॉक्टरांना पैसे मोजावे लागतात. पालिकेत 10 रुपये शुल्क घेऊन उपचार केले जातात.

------------------------------

(संपादनः पूजा विचारे)

Evening clinics started by Mumbai Municipal Corporation have been closed since March


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Evening clinics started by Mumbai Municipal Corporation have been closed since March