मातृभाषेचा प्रत्येकाने अभिमान बाळगा! - अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड

every person shoul honor mother tongue says Actress Prajakta Gaikwad
every person shoul honor mother tongue says Actress Prajakta Gaikwad

कांदिवली : आपली मराठी भाषा विविध अलंकाराने, आविष्काराने नटलेली आहे. मातृभाषेतूनच सर्वांगीण विकास होतो. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या भाषेचा स्वाभिमान, गर्व आणि सार्थ अभिमान बाळगला पाहिजे, असे प्रतिपादन सध्या सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिने केले. 'सकाळ' माध्यम समूह व पायोनियर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून मराठी राजभाषा दिनानिमित्त झालेल्या विशेष कार्यक्रमात उपस्थित राहून तिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. 

8 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी स्वहस्ताक्षरात सजविलेले 'ऋणानुबंध पूर्वार्ध आणि उत्तरार्ध' हस्तलिखितांचे प्रकाशन प्राजक्ताच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक शंकर सावंत, अधिवेशन प्रमुख रवींद्र साळुंके आणि ज्ञानेश्‍वरी मराठी ग्रंथालयाचे संचालक हेमचंद्र नार्वेकर सहभागी होते. हस्तलिखितामध्ये काव्य, कथा, व्यंगचित्र, पर्यावरण, विज्ञान इत्यादी बाबींवर उल्लेखनीय लेखन करण्यात आले आहे. 'सकाळ'ची लहानापासून मी वाचक आहे. तुम्हीही 'सकाळ'शी नाते जोडा, असा सल्ला प्राजक्ताने विद्यार्थ्यांना दिला. 

'संभाजी' मालिकेतील 'ध्येय गाठण्यासाठी जिद्द हवी, जिद्द येण्यासाठी स्फुरण हवं, स्फुरण चढण्यासाठी नेतृत्व हवं, नेतृत्वासाठी कर्तृत्व हवं, कर्तृत्वाचा पराक्रम हवा, देशभक्ती हवी आणि सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो हे सगळं मराठी माणसाला फक्त एकाच नावात अनुभवायला मिळतं, ते नाव म्हणजे छत्रपती संभाजी महाराज' हा संवाद प्राजक्ताने ऐकवताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com