esakal | "संपूर्ण ठिकरा उद्धव ठाकरेंवर फोडायचा आणि आपण नामनिराळं राहायचं"
sakal

बोलून बातमी शोधा

"संपूर्ण ठिकरा उद्धव ठाकरेंवर फोडायचा आणि आपण नामनिराळं राहायचं"

महाराष्ट्रातला आतापर्यंत केंद्राकडून २८ हजार १०४ कोटींची मदत

"संपूर्ण ठिकरा उद्धव ठाकरेंवर फोडायचा आणि आपण नामनिराळं राहायचं"

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. गेल्या काही दिवसतात अनेक बड्या नेत्यांचा राज भावनांवर राबता पाहायला मिळाला. अशात महाराष्ट्रात राजकीय गणित बदलणारा का? महाराष्ट्रात राजकीय भूकंप येणार का? या चर्चांना उधाण आलं. अशातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी या सर्व प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. महाराष्ट्रात आम्हाला सरकार स्थापन करण्यात कोणतीही घाई नसल्याचं फडणवीस म्हणालेत. 

मोठी बातमी : 'अर्सेनिक अल्बम 30' गोळ्यांबाबत सरकारच 'संभ्रमावस्थेत', पण उत्साही कार्यकर्त्यांकडून गोळ्यांचे सर्रास वाटप

राणे हे अन्याय सहन करू शकत नाही :  

नारायण राणे यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली. नारायण राणे हे भाजपातील जेष्ठ नेते आहेत. राणे हे अन्याय सहन करू शकत नाही आणि थेट बोलतात आणि म्हणूनच त्यांनी एकंदरीत राज्यातील परिस्थिती पाहता त्यांचं स्वतःचं मत मांडलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. 

राहुल गांधी यांच्या विधानावर आश्चर्य

याचसोबत फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्या विधानावर आश्चर्य व्यक्त केलंय. महाराष्ट्रात काँग्रेसने सरकारला बाहेरून पाठिंबा दिलेला नाही. महाराष्ट्रातील सरकारचा काँग्रेस एक भाग आहे. महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती हाताबाहेर जातेय हे पाहता काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं वक्तव्य जबाबदारी झटकणारं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर खापर फोडण्याचा हा प्रयत्न असल्याचं मत मत देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मांडलंय.

मोठी बातमी - सावधान ! मधुमेह, उच्चरक्तदाब ठरतोय कोरोनाबाधितांमध्ये 'मृत्यू'चे कारण, तब्बल 'इतक्या' टक्के लोकांचा बळी

केंद्राकडून २८ हजार १०४ कोटींची मदत

केंद्राकडून महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही असं चित्र निर्माण केलं जातंय. वारंवार चुकीचं सांगितलं गेलं तर लोकांना तेच खरं वाटायला लागतं. अशात केंद्राकडून महाराष्ट्राला कशाप्रकारे मोठी मदत केली गेली याबाबत फडणवीसांनी माहिती दिली. महाराष्ट्रातला आतापर्यंत केंद्राकडून २८ हजार १०४ कोटींची मदत दिली गेल्याचं फडणवीसांनी पत्रकार परिषदेत त्यांनी म्हटलंय. 
 

loading image