Manikrao Kokatesakal
मुंबई
Manikrao Kokate: रम्मी खेळतानाचे व्हिडीओ शेअर केले, बदनामी झाली; रोहित पवारांना मंत्री कोकाटेंची नोटीस
Rohit Pawar: माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानपरिषदेतील रमी खेळतानाच्या व्हिडिओवरून वाद निर्माण झाला आहे. या व्हिडिओवरून रोहित पवार यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे कोकाटे यांनी त्यांना मानहानीची नोटीस बजावली आहे.
मुंबई: माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानपरिषदेतील रमी खेळतानाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सरचिटणीस व आमदार रोहित पवार यांनी बदनामीकारक पोस्ट लिहिल्याप्रकरणी कोकाटे यांनी त्यांना मानहानीचे नोटीस बजावली आहे. रोहित पवार यांनीच त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर ही नोटीस पोस्ट करून माहिती दिली आहे.