रावसाहेब दानवेंचे जावई राज ठाकरे यांच्या भेटीला; कुरुष्णकुंजवर खलबतं..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 18 January 2020

मुंबई - राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आपल्या इंजिनाचे ट्रॅक बदलताना पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर काही अत्यंत महत्त्वाच्या बैठक बोलावल्या आहेत. या बैठकांमध्ये येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिलावहिला महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या तयारी संबंधित या सर्व बैठक असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सांगताना पाहायला मिळतायत. 

मुंबई - राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष पराभवाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी आपल्या इंजिनाचे ट्रॅक बदलताना पाहायला मिळतोय. याच पार्श्वभूमीवर आज राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर काही अत्यंत महत्त्वाच्या बैठक बोलावल्या आहेत. या बैठकांमध्ये येत्या २३ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पहिलावहिला महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या तयारी संबंधित या सर्व बैठक असल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते सांगताना पाहायला मिळतायत. 

मात्र मनसेच्या बैठकीदरम्यान एक वेगळा चेहरा पाहायला मिळाला. हा चेहरा होता भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा. हर्षवर्धन जाधव हे शिवस्वराज्य पक्षाचे मराठवाड्यातील नेते आहेत. हर्षवर्धन जाधव हे २००९ मध्ये मनसेच्या तिकिटावर विधानसभा निवडणूक जिंकले होते. त्यामुळे मूळचे मनसेवासी  हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याने आता अनेकांच्या भुवया उंचावलेल्या पाहायला मिळतायत.  

मोठी बातमी - मनसे मेळाव्याची निमंत्रणपत्रिका पाहिली का ? निमंत्रणपत्रिकेतून कसले संकेत ?

आजच्या बैठकांमध्ये स्वतः राज ठाकरे, अविनाश जाधव, अभिजीत पानसे, राजू पाटील, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत आदी मनसे नेते कृष्णकुंजवर आहेत. 

राज ठाकरे यांचा पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपली भूमिका बदलताना पाहायला मिळतोय असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. येत्या २३ तारखेला राज ठाकरे मनसेच्या महामेळाव्यातून आपली भूमिका स्पष्ट करताना पाहायला मिळतील. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आपला झेंडा देखील बदलणार असल्याचं बोललं जातंय. 

मोठी बातमी - वाहनांसाठी आकर्षक क्रमांक ...नको रे बाबा!

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भेट : 

गेल्या काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परळमधील एका निवासी इमारतीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती.  या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे हातमिळवणी करणार का? असे प्रश्न उपस्थित झालेत. खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी "मनसेने आपली भूमिका बदलली आणि परिस्थिती आल्यास, मनसे सोबत जाण्याचा विचार केला जाऊ शकतो" असं वक्तव्य केलं होतं.

Inside Story - डॉक्टर बॉम्ब आहे तरी कोण ? 

अशातच आज  भाजपचे वरिष्ठ नेते रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरेंची भेट घेल्यामुळे कृष्णकुंजवर नक्की काय खलबतं सुरु आहेत? असा प्रश्न सर्वांना पडलाय. हर्षवर्धन जाधव याच्यासोबत प्रकाश महाजन हे देखील राज ठाकरे यांच्या भेटीला आले होते. येत्या २३ तारखेला होणाऱ्या मनसेच्या महामेळाव्याला राज ठाकरे यांनी मला बोलावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. राज ठाकरे यांचा हिंदुत्वाचा मुद्दा पटला म्हणून मला राज ठाकरे यांच्यासोबत काम करायचं आहे असं देखील महाजन म्हणालेत. 

ex mns leader harshawarshan jadhav met raj thackeray at krushnakunja

  

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex mns leader harshawarshan jadhav met raj thackeray at krushnakunja