पोलिस भरतीसाठी उद्या परीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

नवी मुंबई - नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने सुरू असलेल्या पोलिस भरतीची लेखी परीक्षा बुधवारी (ता. ११) नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी दिलेले ओळखपत्र सोबत घेऊन येण्याचे आवाहन पोलिस उपायुक्त (मुख्यालय) प्रवीण पवार यांनी केले आहे. लेखी परीक्षेला ओळखपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. 

नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या वतीने १७५ शिपाई आणि २३ कारागृह शिपाई यांची रिक्त पदे भरण्यात येत आहेत. महिनाभरापासून भरती प्रक्रिया सुरू आहे. १९८ जागांसाठी राज्यभरातून २५ हजार ८०९ उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यात २१ हजार २५२ पुरुष; तर चार हजार ५५७ महिला उमेदवारांचा समावेश होता. या उमेदवारांची मैदानी चाचणी व कागदपत्रांची पडताळणी झाली आहे. मैदानी चाचणीत गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांची बुधवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. यातील पात्र उमेदवारांची यादी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाचे संकेतस्थळ, पोलिस आयुक्त कार्यालय आणि कळंबोलीतील मुख्यालयाच्या नोटीस बोर्डवर आहे. पात्र उमेदवारांना मोबाईलवर एसएमएस व ई-मेलद्वारे कळवण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारी सकाळी ८.३० वाजता परीक्षा होईल.

सीसी टीव्हीची नजर  
पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी नेरूळमधील पाटील स्टेडियमभोवती व आत कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. याशिवाय या परिसरातील हालचालींवर सीसी टीव्हीचीही नजर असेल. उमेदवाराशिवाय इतरांना केंद्रात प्रवेश दिला नाणार नाही.

Web Title: Examination for police recruitment tomorrow