Sharad Pawar
sakal
मुंबई: ‘‘राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत. त्याचबरोबर पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करून शेतकरी तसेच व्यावसायिकांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी,’’असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शासनाला सुचविले आहे.