मुंबईतील कोळीवाड्यांच्या सिमांकनात मोकळ्या जागा वगळल्या; मासळी सुकायचे भुखंड गावा बाहेर

समीर सुर्वे
Saturday, 17 October 2020

मुंबई महानगर पालिकेने शहरातील 13 कोळीवाड्याच्या सुधारीत सिमांकन निश्‍चित करुन त्याचा मसुदा जाहीर केला आहे.

मुंबई : मुंबई महानगर पालिकेने शहरातील 13 कोळीवाड्याच्या सुधारीत सिमांकन निश्‍चित करुन त्याचा मसुदा जाहीर केला आहे.मात्र, गावांच्या सिमांमधून मासळी सुकवण्याच्या बोटी लावण्याच्या जागा वगळण्यात आल्याचा आक्षेप ग्रामस्थांकडून घेतला जात आहे. मुंबई महानगर पालिकेच्या विकास आराखडा 2034 मध्ये कोळीवाडे आणि गावठाण्यांना विशेष दर्जा देण्यात असून त्यांच्यासाठी स्वतंत्र नियमावली आहे.या गावांमध्ये बैठकी,एक मजली घरी असली तरी ती झोपडपट्टांमध्ये गणली जात नाही.त्यांचा स्वतंत्र पणे विकास करता येतो.

कॉंग्रेस आगामी BMC निवडणूक स्वतंत्र लढणार? पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मुंबई अध्यक्ष बदलण्याचीही सुचना

सिमांकनावर कोळीवाड्यांमधून आक्षेप नोंदवला जात आहे."कोळीवाडा म्हणजे फक्त घरे नाहीत त्या परीसरात मासळी सुकवण्याची आणि बोटी लावण्याची मोकळी जागा असते.या जागा कोळीसमाजाने परंपरने जपल्या आहेत.त्याच जागा कोळीवाड्याच्या हद्दीत दाखविण्यात आलेल्या नाहीत असा आक्षेप कोळीमहासंघाचे सरचिटणी राजहंस टपके यांनी नमुद केले.वर्सोवा कोळीवाड्यातील स्मशाणाची जागा ही गावा बाहेर दाखविण्यात आली आहे.मुळात परंपरेनुसार स्मशाण हे गावाच्या वेशीवर असते.त्यामुळे ही जागा गावाचीच आहे.या जागा गावात न दाखवल्याने त्यांच्या गावाची मालकी राहाणार नाही.भविष्यात येथे कोणताही प्रकल्प राबवला जाईल.त्यावर ग्रामस्थ कोणताही आक्षेपही घेऊ शकत नाही.त्याच परीणाम थेट व्यवसायावर होणार असल्याने या बाबत गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.तसेच,महानगर पालिकेकडे याबाबत आक्षेपही नोंदविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.तर,गावठाणाच्या हक्कांसाठी काम करणारे गॉडफ्री पिमेंटो यांनीही जुहू कोळीवाड्याची जागा गावा बाहेर दाखवली असल्याची सांगितले.सर्वच ठिकाणी ही समस्या असून त्यासाठी स्थानिक कोळीवाड्यांकडूनही आक्षेप नोंदवला आहे.असेही गॉडफ्री यांनी सांगितले.

सरकार इलेक्ट्रॉनिक मिडियावर अंकुश का ठेवत नाही; उच्च न्यायालयाचा सवाल

महानगर पालिकेने 2018 मध्ये मंजूर केलेल्या विकास आराखड्यात 52 गावठाणे आणि 26 कोळीवाड्यांचे सिमांकन निश्‍चित केले होते.त्यानंतर आता 13 कोळीवाड्यांचे सुधारीत सिमांकन करुन त्यांचा मसुदा जाहीर करण्यात आला आहे.यावर 30 ऑक्‍टोबर पर्यंत सुचना व हरकती मागवविण्यात आल्या आहेत.मुंबईत 189 गावठाणे आणि 42 कोळीवाडे आहेत.

हद्दी निश्‍चिती कशासाठी
-कोळीवाडे,गावठाणे हे झोपडपट्ट्या नसुन त्यांच्या विकासासाठी स्वतंत्र नियमावली आहे.तसेच,काही गावठाणे आणि कोळीवाड्यांना हेरीटेज दर्जाही आहे.गावांमधील अनेक घरे वैशिष्ट पुर्ण आहे.हद्दी निश्‍चित झाल्यास भविष्यात गावांच्या हद्दीवरुन वाद होणार नाही.

या कोळीवाड्यांच्या सिमांकनात सुधारणा
मनोरी,भाटी,वझीरा बोरीवली,वर्सोवा,मालवणी,चारकोप,गोराई,चिंबई वांद्रे,खारदांडा,मढ,जुहू,तुर्भे,माहुल

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Excludes spaces in the demarcation of Koliwada in Mumbai Fish drying plot outside the village

टॉपिकस