

Three Language Formula
ESakal
मुंबई : शालेय शिक्षणात पहिलीपासून त्रिभाषा धोरणाचे सूत्र लागू करण्यासाठी माजी कुलगुरू व ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेला समितीला राज्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, विचारवंत, मान्यवरांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शविला आहे. राज्यात कोणत्याही स्थितीत पहिलीपासून हिंदी आणि इतर कोणतीही त्रिभाषा लागू करू नये, यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतात, असे सांगत विविध मान्यवरांनी त्रिभाषा धोरणाच्या सूत्रालाच आपला विरोध दर्शविला आहे. काही मान्यवरांनी यावर पर्याय सुचवून राज्यातील मराठी शाळांच्या दुरवस्थेबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.