Explosives Found at Kalyan Railway Station : कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळली स्फोटके!

Kalyan railway station News : कल्याण रेल्वे पोलीस ठाणे हद्दीत कल्याण रेल्वे स्टेशनच्या जवळ एका बेवारस बॅगेमध्ये डीटोनेटर (स्फोटके) मिळून आल्याने एकच खळबळ उडाल्याचे पाहायाला मिळालं.
Explosives found in an abandoned bag at Kalyan railway station Marathi Latest News
Explosives found in an abandoned bag at Kalyan railway station Marathi Latest News
Updated on

Explosives found at Kalyan railway station Latest News : डोंबिवली - कल्याण रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 येथे एक बेवारस बॅग मध्ये डिटोनेटर आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलीस, विशेष तपास पथक व डॉग स्कॉड तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सदर बॅग मध्ये 54 डिटोनेटर आढळून आले आहेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे. हे येथे कोणी कशासाठी आणून ठेवले याचा तपास पोलिसांनी सुरू केला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.

कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 जवळील कँटीन जवळील झाडाच्या जवळ एक बेवारस बॅग बुधवारी आढळून आली. 11 ते 11.30 च्या सुमारास सफाई कर्मचारी हे आपले काम करत असताना त्यांना झाडाखाली एक बॅग दिसली. त्यांनी त्याची पाहणी केली असता त्यात संशयास्पद वस्तू आढळून आल्याने त्याने याची माहिती तात्काळ रेल्वे पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी विशेष तपास पथक, डॉग स्कॉड, बॉम्ब शोधक नाशक पथक देखील तेथे पोहोचले. सध्या हे स्फोटक पोलिसांनी हस्तगत केले आहे.

Explosives found in an abandoned bag at Kalyan railway station Marathi Latest News
ICC Test Rankings : सर्फराज खानने पदार्पणासह ICC कसोटी क्रमवारीत मारली एन्ट्री! दिग्गजांना टाकले मागे

याविषयी पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, कल्याण रेल्वे स्टेशन पश्चिम साईडला 54 इलेक्ट्रिक डिटोनेटर मिळाले आहेत. विहीर किंवा खदानी अशा ठिकाणी जे जिलेटिन वापरतात ब्लास्टसाठी ते हे असल्याचे प्राथमिक तपासात तस आपण म्हणू शकतो. सफाई कामगाराच्या मार्फत आम्हाला ही माहिती मिळाली. त्यानुसार तपास केला असता त्या ठिकाणी बॅग आढळून आली. हे फक्त डीटोनेटर आहे. त्याचा स्फोट होण्याची शक्यता नाही मार्केटमध्ये हे सहज उपलब्ध होतात. या घटनेची कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून तपास सुरू केला आहे. हे येथे कोणी कशासाठी आणले याचा देखील तपास सुरू आहे

Explosives found in an abandoned bag at Kalyan railway station Marathi Latest News
Rajiv Jain On LIC Shares : माझं ते चुकलं...! अदानींना संकटातून बाहेर काढणाऱ्या राजीव जैन यांनी LIC वरून व्यक्त केला पश्चाताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Kalyan Latur Expressway Project Details
A Swift car fell into a 20-foot ditch near Railway Gate No. 96 at North Koparde after losing control at an S-shaped turn; all five occupants survived safely.
Arif Pathan Kalyan Crime
Central Atal Beemit Vyakti Kalyan Yojana
Marathi News Esakal
www.esakal.com