'एक्सप्रेस कोविड टेस्ट'मुळे आता 13 मिनिटात येणार कोरोना चाचणीचा अहवाल

'एक्सप्रेस कोविड टेस्ट'मुळे आता 13 मिनिटात येणार कोरोना चाचणीचा अहवाल

मुंबई, ता 30 : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने 'एक्सप्रेस कोविड19 टेस्ट'  म्हणजेच जलद चाचण्या सुरू केल्या आहेत. या चाचण्यांचा निकाल अवघ्या 13 मिनिटात हाती येतो. परदेशातून 28 डिसेंबरपर्यंत मुंबईत आलेल्या 400 प्रवाशांवर एक्सप्रेस कोविड टेस्ट करण्यात आल्या असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने पत्रक काढून दिली. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने मंगळवारपासून या नव्या चाचण्या सुरू केल्या आहेत. 24 तास या चाचण्यांची सुविधा उपलब्ध आहे. केवळ 13 मिनिटात चाचण्यांचा निकाल येत असून एका चाचणीला 4,500 रुपये इतका खर्च आहे. 

डिसेंबर 15 पासून या चाचण्यांना सुरुवात करण्यात आली असून दिवसाला साधारणतः 30 ते 35 चाचण्या करण्यात येत असल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 400 प्रवाशांपैकी अधिकतर प्रवासी हे महाराष्ट्राबाहेरील होते असे ही सांगण्यात आले. 

ICMR ने ठरवून दिलेल्या गुणवत्ता निर्देशानूसार या चाचण्या करण्यात येत आहेत. अशा चाचण्या विमानतळ प्रशासनाने  पहिल्यांदाच सुरू केल्या आहेत. या चाचण्यांचा निकाल जलद आणि विश्वासार्ह असल्याचेही विमानतळ प्रशासनाने म्हटले आहे. याशिवाय प्रवाशांना RT-PCR चाचण्यांचा पर्याय देखील उपलब्ध असल्याचेही सांगण्यात आले. 

या चाचण्यांमुळे वेळ कमी लागत असल्याने या चाचण्या प्रवाशांसाठी फायदेशीर ठरल्या आहेत. यामुळे विमानतळावरील गर्दी देखील कमी होण्यास मदत मिळत आहे. शिवाय चाचण्यांचे निकाल झटपट येत असल्याने संसर्ग पसरण्याचा धोका कमी झाला आहे. शिवाय पॉझिटिव्ह असलेल्या प्रवाश्यांना उपचार ही लवकर सुरू करता येतात. 

( संपादन  - सुमित बागुल )

covid express tests starts on mumbai airport now reports will come in 13 minutes 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com