अकरावी प्रवेशाची मुदतवाढ देण्यात यावी 

प्रमोद पाटील
बुधवार, 13 जून 2018

सफाळे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गेल्या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने निकाल शुक्रवारी (ता.8)जाहीर केला आहे. या निकालाची गुण पत्रिका शुक्रवारी (ता.22) रोजी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने अकरावी प्रवेशाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी पालकांबरोबरच प्राचार्य करत आहेत. 

सफाळे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने गेल्या मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन पद्धतीने निकाल शुक्रवारी (ता.8)जाहीर केला आहे. या निकालाची गुण पत्रिका शुक्रवारी (ता.22) रोजी विद्यार्थ्यांना मिळणार असल्याने अकरावी प्रवेशाची मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी पालकांबरोबरच प्राचार्य करत आहेत. 

मात्र मुंबई येथील विभागिय शिक्षण उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी ऑफलाईन पद्धतीने इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी काढलेला पत्रकात दिनांक 12 ते 18 जून अकरावी प्रवेश अर्ज वितरण, 13 ते 19 जून अर्ज संकलन करणे, 20जून रोजी मेरीट प्रमाणे यादी तयार करणे, 21 ते 23 जून रोजी प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश फी स्वीकारणे, 25 जून रोजी प्रथम गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांनीप्रवेश न घेतल्यास रिक्त जागांसाठी संध्याकाळी चार वाजता दुसरी प्रदर्शित करणे, 26 ते 28 जून रोजी दुसरया यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश फी स्वीकारणे या पद्धतीने अकरावी प्रवेशाची पहिली, दुसरी, तिसरी, चौथी यादी प्रदर्शित होऊन अंतिम प्रवेश 5 जुलै पर्यंत अकरावी प्रवेश देण्यात येईल असे जाहीर केले आहे. 

या पूर्वी अर्ज संकलन करताना अर्जा सोबत या अगोदर शाळा सोडल्याचा दाखला, गुण पत्रिका झेरॉक्स, व इतर जात/खेळाडू इत्यादी सत्यप्रती अर्जासोबत जोडलेल्या असायच्या. पण आता मार्कलिस्ट व शाळा सोडल्याचा दाखला नसल्याने अर्ज कसा घ्यायचा? तसेच एखाद्या विद्यार्थ्यांकडे जातीचा दाखला नसेल तर त्याला शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जातीच्या उल्लेख वरून त्या- त्या प्रवर्गात टाकून त्याच्या कडून प्रवेश देते वेळी हमीपत्र घेतले जाई, आता या दाखल्या शिवाय हा फायदा कसा द्यायचा प्रश्न आहे.

ऑफलाईन 11 वी प्रवेश प्रवेश प्रक्रियेमध्ये पहिल्या फेरी साठी 23 जून ही अंतिम तारीख दिली आहे. शाळांना विद्यार्थ्यांची गुणपत्रिका आल्या शिवाय शाळा सोडल्याच्या दाखल्यावर दहावी उत्तीर्ण असा शेरा मारता येत नाही. तसेच 22 तारखेला गुणपत्रिका मिळाल्या नंतरच शाळा सोडल्याचा दाखला विद्यार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला 22 किंवा 23 जून ला विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. मग 22 तारखेच्या आत 11 वी मध्ये प्रवेश कसा देणार? असा कनिष्ठ महाविद्यालयांना प्रश्न निर्माण झाला आहे. दाखला व मूळ गुणपत्रिका न बघता प्रवेश प्रक्रिया कशी राबवायची? असा सवाल प्राचार्यांनी केला असून, 11 वी प्रवेशाचे जाहीर केलेले वेळापत्रक बदलण्यात यावे अशी मागणी पालघर जिल्हा मुख्याध्यापक संघाने केली आहे. 

Web Title: The extension of the eleventh admision should be extended