दिलासादायक : मजुरांना पोहोचवण्यासाठी 'एसटी'ला मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत करता येणार मोफत प्रवास

st bus
st bus

मुंबई : अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत आणि महाराष्ट्राच्या सीमेवर आलेल्या मजुरांना त्यांच्या जिल्ह्यांत मोफत एसटी प्रवासाची सुविधा दिली जात आहे. त्यासाठी राज्य सरकारने एसटी महामंडळाला निधी दिला आहे. चौथ्या लॉकडाऊनची घोषणा झाल्यानेमुळे ही मुदत 31 मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

आतापर्यंत राज्यातील सुमारे दोन लाखांपेक्षा जास्त परप्रांतीय श्रमिकांना त्यांच्या राज्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. एसटी महामंडळातर्फे 10 दिवसांपासून ही मोफत प्रवासाची सेवा दिली जात आहे. त्यासाठी 15 हजार 367 बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पायी निघालेल्या, ट्रक-टेम्पोतून जाणाऱ्या मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेवर सोडले जात आहे. हा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून केला जाणार असल्याचे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जाहीर केले आहे.

महत्वाची बातमी सारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया?
गैरहजर राहिल्यास निलंबन
मोफत प्रवास योजना 31 मेपर्यंत वाढवण्यात आली असून, एसटी महामंडळाने प्रत्येक आगारातील कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर राहण्याचे आदेश दिले आहेत. गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Extension to ST for traval of laborers Free travel until May 31

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com